IMPIMP

Ajit Pawar | …म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोविड जम्बो हॉस्पीटल सुरूच राहणार

by bali123
Restrictions in Pune | ajit pawar holds review meeting on pune lockdown restrictions Today corona update of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (शनिवारी) पुणे (Pune) दौर्‍यावर होते. कोरोनाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जम्बो कोविड रूग्णालय (Jumbo Covid Hospital) सध्यातरी सुरूच ठेवण्यात येणार आहे, पुढील निर्णय 31 डिसेंबर 2021 रोजी घेतला जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. ही अतिशय दिलासादाक बाब आहे.
परंतु, दक्षिण अफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रोम (Omicron) व्हेरिएंटमुळे (Variant) चिंता वाढलीय.
त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंडवडमधील जम्बो कोविड रूग्णालय सुरूच ठेण्यात येणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, शहरातील रूग्णसंख्या कमी होत असल्याने खूल्या जागेतील गायन आणि इतर कार्यक्रमांना देण्यात आलेली 50 टक्के उपस्थितीची मर्यादा शिथिल करण्यात आलीय.
तसेच डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भिमथडी जत्रेला देखील परवानगी देण्यात आली आहे.
परंतु, या सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन कारावे लागणार असल्याचं ते म्हणाले.
तसेच, पुणे आणि जिल्हातील कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.
या पार्श्वभुमीवर 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Web Title : Ajit Pawar | Jumbo Covid Hospital in Pune and Pimpri-Chinchwad will continue Ajit Pawar

Related Posts