IMPIMP

Ajit Pawar | प्रकाश आंबेडकरांना ‘महाविकास’मध्ये घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

by nagesh
Ajit Pawar | ncp ajit pawar on prakash ambedkar uddhav thackeray mahavikas aghadi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या शिवसेना पक्षासोबत युतीच्या प्रयत्नात आहेत. सोमवारी जागावाटपावरून त्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यामुळे त्यांच्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे बाकी आहे. त्यांना महाविकास आघाडीत घेणार का, यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. जे समविचारी पक्ष येतील त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

जे समविचारी पक्ष येतील, त्यांना सोबत घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि भाई जगताप यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकरांबाबत सकारात्मक आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Ajit Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते. आगामी काळात जागांबाबत या बैठकीत चर्चा झाली.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलात ही बैठक पार पडली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, वंचित बहुजन आघाडीने आपल्या अटी आणि शर्तीवर युती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीसोबत युती झाल्यास किती जागा मिळतील आणि फक्त शिवसेना (ठाकरे गट)
सोबत युती झाल्यास किती जागा मिळतील, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Web Title :- Ajit Pawar | ncp ajit pawar on prakash ambedkar uddhav thackeray mahavikas aghadi

हे देखील वाचा :

Supriya Sule | ‘महाराष्ट्र सरकार कर्नाटकपुढे दुर्बल’ – सुप्रिया सुळे

Pune Crime | भांडण सोडवण्यासाठी आलेल्या दोघांवर कुऱ्हाडीने वार; कोंढवा परिसरातील घटना

Pune ACB Trap | 20 हजारांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts