IMPIMP

Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ

by nagesh
Ajit Pawar | ncp leader ajit pawar maharashtra government palghar health minister tanaji sawant maharashtra assembly session

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याच्या आरोग्य विभागत (Department of Health) किती ढिसाळ कारभार सुरू आहे याचे प्रत्यंतर आज विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session of Legislature) दुसर्‍या दिवशी आहे. आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची माहिती उपलब्ध नसल्याने हा प्रश्न राखीव ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर (Shinde Government) आली. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी माहिती उपलब्ध नसल्याने सोमवारी या प्रश्नाचे उत्तर देऊ असे सांगितले. प्रगत महाराष्ट्रात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जवळच्या पालघर जिल्ह्यात (Palghar District) हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून यासंदर्भातील हा प्रश्न विचारण्यात आला होता. (Ajit Pawar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पालघर जिल्ह्यात हत्तीरोग प्रतिबंध यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी याबाबत प्रश्नांची उत्तरे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मागितली. आरोग्य मंत्र्यांकडे ही माहिती नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही. यामुळे प्रश्न सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.

ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 80 बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील 29 बालकांना या रोगाची लागण झाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाचे लक्ष वेधत म्हटले की, डासांमुळे पसरणारा हत्तीरोग गंभीर आहे. त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या आहेत.

पालघर जिल्ह्यात हत्तीरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम का नाही,
याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न विचारला होता.
मात्र, डॉ. तानाजी सावंत यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे हा प्रश्न उत्तरासाठी सोमवापर्यंत पुढे ढकलण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar maharashtra government palghar health minister tanaji sawant maharashtra assembly session

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | रायगडमध्ये सापडलेली ‘ती’ संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची, देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

Pune Crime | मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या वडिलांचा अल्पवयीन मुलांच्या हल्ल्यात मृत्यू

Raju Srivastava Health Update | राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक, डॉक्टरांनी दिली माहिती, जवळच्या मित्राने सांगितली स्थिती

Related Posts