IMPIMP

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार असल्याची राज्यात चर्चा आहे.
त्यावरुन विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On CM Eknath Shinde Group)
यांनी देखील एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत, असे अजित पवार (Ajit Pawar On
CM Eknath Shinde Group) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाने गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरात नवस केला होता. ते तो नवस पूर्ण करण्यासाठी जात आहेत. कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. शिंदे गटाचे मंत्री, खासदार आणि आमदार पुन्हा एकदा गुहाटीला जाणार असल्याची माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली होती.
तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवस कामाख्या देवीला केला होता,
तो फेडण्यासाठी जात आहोत, असे सांगितले आहे.

त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. काही ठिकाणी बोकडांचा बळी दिला जातो.
काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी दिला जातो. मला कळाले आहे, की तिथे रेड्यांचा बळी दिला जातो.
आता कोणाचा बळी देण्यासाठी ते तिथे चालले आहेत, आपण बघूया, असे अजित पवार म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | cm eknath shinde group faction to visit guwahati again ajit pawar reaction

हे देखील वाचा :

Jhund Movie Fame Babu | झुंड सिनेमातील ‘बाबू’ची भूमिका गाजवलेल्या अभिनेत्याला पोलिसांकडून अटक

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

Related Posts