IMPIMP

Budget 2023 | ‘हा तर निवडणुकांच्या तोंडावर केलेला चुनावी जुमला..;’ विरोधीपक्षनेते अजित पवार यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawars big secret explosion regarding rebellion in shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशातील निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प
(Budget 2023) आहे. अशी खोचक टीका राज्याचे विधानसभा विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर केली आहे. यात
देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या
सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात (Budget 2023) करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ (Welfare State) ची
संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. अशी टीका यावेळी बोलताना अजित पवार यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तर यावर पुढे बोलताना ते म्हणाले, ‘“सन २०१८ ते २०२२ या काळात देशाचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सरासरी अवघा तीन टक्के असताना हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करत, देशाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही आलेले दिसत नाही, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा ‘चुनावी जुमला’ असणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर होईल, अशी जुनीच घोषणा नव्याने करायला लागणे म्हणजे केंद्र सरकारने स्वत:च आपल्या नाकर्तेपणाची कबुली दिलेली आहे. गेल्या चार वर्षाचा ‘जीडीपी’ दर अवघा तीन टक्के असताना देशाचा हा ‘अमृत काळ’ आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री कोणत्या आधारावर म्हणतात, हे कळायला मार्ग नाही.’ असा टोला देखील यावेळी बोलताना त्यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना लगावला.

‘या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भरगोस निधी दिल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील पुणे-नाशिक हायस्पिड रेल्वे प्रकल्पासाठी तसेच मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे का? हे समजायला मार्ग नाही. भाजपाला मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी त्यांची प्राप्तीकराची मर्यादा वाढविण्यासाठी तब्बल आठ वर्षे वाट बघावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर केवळ चुनावी जुमला करुन प्राप्तीकराची मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवली असली तरी ती पुरेशी नाही. ही प्राप्तीकराची मर्यादा वाढवताना फसवेगिरी करण्यात आलेली आहे.’ अशी टीका यावेळी बोलताना अजित पवार यांनी केली.

‘दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? याचे उत्तर या अर्थसंकल्पात (Budget 2023) मिळालेले नाही. ‘मेक इन इंडिया’ (Make in India), ‘आत्मनिर्भर भारत’ (Atmanirbhar Bharat) या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील पोकळ घोषणाही हवेत विरुन जातील, असे दिसते. महागाई (Inflation) कमी करण्यासाठी आणि रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना नाही.’ असा गंभीर प्रश्न देखील यावेळी बोलताना अजित पवार यांनी उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच शेतकऱ्यांसाठीच्या हमीभावावर (MSP) बोलताना अजित पवार म्हणले की, ‘गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना या अर्थसंकल्पातून काहीही ठोस देण्यात आलेले नाही. देशातील शेती आणि शेतकरी संकटात आहे.
सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची (Swaminathan Commission)
अंमलबजावणी करुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव देण्याविषयी अर्थसंकल्पात चकार शब्द काढण्यात आलेला नाही.’
हे देखील यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

तर, मुंबईला अर्थसंकल्पातून विशेष काही देण्यात आले नाही.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘देशातील उद्योगपतींची दहा लाख कोटींची कर्ज माफ केल्याबाबतचा साधा खुलासाही अर्थसंकल्पात आलेला नाही.
तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आणि कोट्यवधी सामान्य गुंतवणुकदारांना देशोधडीला लावणाऱ्या
देशातल्या एका बड्या उद्योजकाच्या प्रकरणात केंद्र सरकार हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
तसेच, महानगरपालिकेने केलेल्या कामांची उद्घाटने तर धुमधडाक्यात झाली.
पण, मुंबईला अर्थसंकल्पातून विशेष काही मिळाल्याचे सध्या तरी दिसत नाही.
एकूणच या अर्थसंकल्पाने महाराष्ट्रासह देशाची घोर निराशा केलेली आहे.’ असे यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | opposition leader ajit pawar attacked modi government over budget 2023

हे देखील वाचा :

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune RTO Office | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 57 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

Related Posts