IMPIMP

Ajit Pawar | जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा गृहमंत्री करा म्हंटलं, पण वरिष्ठांनी…, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली खदखद

by nagesh
Ajit Pawar | opposition leader ajit pawar wants the post of home minister did you express your feelings in front of the activists

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना निर्भीड नेता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक नसते. मनात आलं की ते लगेच बोलून दाखवतात. पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसमोर तर अजित पवार (Ajit Pawar) आणखीनच खुलून बोलतात. शहर कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत (City Executive Review Meeting) अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. सरकारमध्ये असताना किती वेळा मी गृहमंत्रीपद (Home Minister) मागितलं, पण वरिष्ठांनी काय दिलं नाय… त्यांना वाटतं याला गृहमंत्रिपद दिल्यावर हा आपलंही ऐकणार नाही…, असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मात्र यामुळे अजित पवारांच्या मनातली गृहमंत्रिपदाबाबतची खदखद समोर आल्याची चर्चा होत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुण्यातील कार्यकर्ता बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीका करत असताना एका कार्यकर्त्याने तुम्हीच गृहमंत्री व्हा, असे म्हटले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, जेव्हा जेव्हा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) केले. तेव्हा मी वरिष्ठांना म्हटले की माझ्याकडे गृहखाते द्या. पण वरिष्ठांना वाटते की याला गृहखाते दिले की हा आपले पण ऐकायचा नाही, असे पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, मला जे योग्य वाटलं ते स्वीकारलं. राष्ट्रवादीचा जरी चुकला दादा पोटात घ्या म्हणाला तरी पोटात नाही आणि ओठात नाही. सर्वांना नियम सारखेच आहे.

मागे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावेळी मी गृहमंत्रीपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही.
त्यांचं गेल्यावरही मागितलं तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे (Dilip Walse Patil) गृह मंत्रालयाची धुरा दिली गेली. अस अजित पवार म्हणाले.

आमदार चेतन तुपे (MLAs Chetan Tupe) आणि सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांना विचारा,
मी मागे पण बैठका घ्यायचो. त्यात सांगायचो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जरी चुकला, तरी नियम एके नियम,
त्यातून सूट नाही. दादा पोटात घ्या-पोटात घ्या, असलं चालणार नाही. दादाच्या ओठात आणि पोटात एकच असतं,
हे तुम्हाला माहितीय. कार्यकर्ता चुकत नसेल तर त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा राहतो ना… पण कार्यकर्ताच
चुकतोय म्हटल्यावर किती पांघरुण टाकायचं… पांघरूण कमी पडायचे ना.. अशी फटकेबाजी अजित पवारांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | opposition leader ajit pawar wants the post of home minister did you express your feelings in front of the activists

हे देखील वाचा :

Keshav Upadhye | आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा!, आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

Pune Crime | चित्रपट निर्मितीसाठी पुण्यात सुरु केली वित्तिय संस्था, कर्ज मंजुरीच्या आमिषाने 100 ते 150 जणांना फसवणारी बंटी-बबलीची जोडी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime | रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे दुचाकीस्वार महिला पोलीस गंभीर जखमी, केबल टाकणाऱ्यांच्या विरोधात FIR

Related Posts