IMPIMP

Ajit Pawar | पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 18 टक्के, अजित पवारांचे काळजी घेण्याचे आवाहन

by nagesh
Ajit Pawar | Positivity rate of Pune city 18 percent, Ajit Pawar appeal to punekar take care

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) पुण्यात कोरोना आढावा बैठक अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे देखील उपस्थित होते. यावेळी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 18 टक्के झाल्याचे सांगून अजित पवार (Ajit Pawar) यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज दिवसभरात पुणे शहरामध्ये 1104 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याचे अजित पवार (Ajit
Pawar) यांनी सांगितले. तसेच 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थी, पालकांचा लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 10 जानेवारी नंतर 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस (Booster Dose) दिला जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. याशिवाय फ्रंट लाइन वर्कर्स (Front Line Workers) यांना देखील बुस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मास्कच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या बाजारात अनेक प्रकारचे मास्क मिळत आहे. परंतु हे मास्क उपयोगाचे नाहीत. सर्वांनी डबल लेअर चे मास्क (Double Layer Mask) किंवा N95 मास्क वापरण्याचे आवाहन अजित पवार यांनी दिली. तसेच उद्यापासून पासून मास्क शिवाय (Mask) कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याशिवाय कुणी मास्क नसताना थुंकताना दिसला तर त्या व्यक्तीकडून 1000 रुपये दंड घेतला जाईल, असेही अजित पवार यांनी आज घोषीत केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | Positivity rate of Pune city 18 percent, Ajit Pawar appeal to punekar take care

हे देखील वाचा :

Restrictions in Maharashtra | राज्यात निर्बंध वाढणार? अजित पवारांनी सांगितलं…

Pune Crime | एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नागरिकाची फसवणूक, 3 जणांवर FIR

Gold Price Today | सोन्याची घसरण सुरूच, चांदीची चमक सुद्धा उतरली, जाणून घ्या आजचा नवीन दर

Related Posts