IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांशी संबंधीत साखर कारखान्यांवर आयकर विभागाचे छापे, उपमुख्यमंत्री म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ...Then economic crisis in the state - Ajit Pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित असलेल्या साखर कारखान्यांसह जवळच्या नातेवाईकावर गुरुवारी प्राप्तीकर विभागाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली. मुंबईच्या पथकासह पुण्यातील पथके देखील या कारवाईत सहभागी झाली आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax) विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरंडेश्वर साखर कारखाना, पुण्यदसशेश्वर साखर कारखाना, अंबालिका साखर कारखाना, दौंड शुगर आणि नंदुरबार येथील एका साखर कारखान्यावर एकाच वेळी हे धाडसत्र आरंभण्यात आले. यासोबतच बारामती येथे पवारांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरी देखील प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचले असून तेथे देखील तपासणी सुरू करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी या साखर कारखान्यांच्या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येते आहे. या कारवाईमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू असून आर्थिक व्यवहार देखील तपासले जात आहेत. यासंदर्भात विस्तृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नसली तरी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः साखर कारखानदारी मध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप झाल्याने प्राप्तिकर विभागाच्या (income tax raid) कारवाईकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, माझ्याशी संबंधित कंपन्यावर धाड टाकली याबद्दल माझा कोणताही आक्षेप नाही.
मात्र माझ्या बहिणींच्या कोल्हापूर (Kolhapur) आणि पुण्यातील (Pune) घरांवर धाडी टाकण्यामागील कारण मला उमगलेले नाही.
त्यांची लग्न झालेली असून उत्तम संसार सुरू आहे. त्यांच्या मुला-मुलींची लग्न देखील झालेली आहेत. त्यांना नातवंडे आहेत.
केवळ अजित पवार यांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर याचा जनतेने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
तपास यंत्रणांचा अतिशय खालच्या थराला जाऊन वापर केला जात आहे. कोणावर छापेमारी करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे.
मी नियमित कर भरतो अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही,
टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळेवर भरला जातो.
तरीही केवळ राजकीय हेतूने या धाडी टाकल्या जात असल्याचे पवार म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title :- Ajit Pawar | Raids of Income Tax Department on sugar factories related to Ajit Pawar, Deputy Chief Minister said …

हे देखील वाचा :

Rajesh Tope | दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता? राजेश टोपे म्हणाले…

Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी

Ajit Pawar | अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची ‘छापेमारी’; उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

Related Posts