IMPIMP

Ajit Pawar – Raj Thackeray | आम्ही दोघे ‘ओठात एक आणि पोटात एक’ असे बोलत नाही; अजित पवार राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत

by nagesh
Ajit Pawar | ncp ajit pawar mocks mns raj thackeray on sharad pawar cast politics in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Ajit Pawar – Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचे विचार त्यांच्यासोबत आहेत आणि माझे विचार माझ्यासोबत आहेत. आम्ही स्पष्टपणे बोलणारे आहोत. ओठात एक आणि पोटात एक अशी आमची पद्धत नाही’. असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटले. (Ajit Pawar – Raj Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा रविवारी मुंबईत मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी महापुरूषांवरून वाद नकोत, अशी भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते पवार यांनी देखील हीच भूमिका मागील काळात घेतली होती. त्यावर पवार आणि राज ठाकरेंची भूमिका सारखी झाल्याने पत्रकारांनी पवारांना प्रश्न केला की, राज ठाकरेंनी तुमचे एेकले का? त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पवार म्हणाले, त्यामुळे महापुरूषांच्या वादावर मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही जे बोलतो, ती आमची वैयक्तिक भूमिका असते, ती पक्षाची भूमिका नसते. पक्षाची भूमिका प्रवक्ते, पक्षाचे प्रांताध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करतात. परंतु, विरोधी पक्षनेता म्हणून समाजात जगताना मला जे वाटते, ते मी माध्यमांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील अजित पवारांनी आपले मत नोंदविले आहे.
आमचे सरकार असताना, इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही खटाटोप केला होता.
आमच्या अपेक्षेप्रमाणे ताबडतोब निवडणुका लागल्या पाहिजेत. परंतु आता सतत निवडणुका पुढे पुढेच चालल्या आहेत.
सहकार क्षेत्रातील निवडणुका लागल्या आणि ज्यांना निवडून यायचे ते निवडून आले.
मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का लागत नाहीत?, असा प्रश्न यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar – Raj Thackeray | ajit pawar comment on mns chief raj thackeray speech in mumbai

हे देखील वाचा :

Life Certificate for Pensioners | शेवटचे काही दिवस बाकी, जर ‘हे’ काम नाही केले तर मिळणार नाही पेन्शन

Pune Pimpri Crime | मित्र तुरुंगात गेल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, भोसरी परिसरातील घटना

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल

Related Posts