IMPIMP

Akshay Kumar | 25 वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत होता अक्षय कुमार, समोर आले ‘अंडरटेकर’ सोबतच्या कुस्तीचे सत्य

by nagesh
Akshay Kumar | akshay kumar had been fooling people for 25 years the truth

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Akshay Kumar | बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या अ‍ॅक्टिंगसाठी ओळखला जातो. अक्षयचे असंख्य चाहते आहेत. अक्षय कुमारला बॉलीवुडमध्ये यश ’खिलाडियों का खिलाडी’ (Khiladiyon Ka Khiladi) या चित्रपटातून मिळाले, यानंतर त्याचे अनेक मोठे चित्रपट आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काही दिवसांपूर्वीच ’खिलाडियों का खिलाडी’ने आपली 25 वर्ष पूर्ण केली आहेत. अशावेळी अक्षयने (Bollywood actor Akshay Kumar) चित्रपटाशी संबंधीत काही आठवणीतील छायाचित्रे शेयर केली, सोबतच त्याने एक खुलासा सुद्धा केला आहे, जो ऐकून चाहते आणि सोशल मीडिया यूजर त्याच्यावर टीका करत आहेत.

अक्षयने (Akshay Kumar) एक मीम शेयर करत खुलासा केला आहे की, ’खिलाडियों का खिलाडी’मध्ये त्याने WWE रेसलर अंडरटेकर (WWE Wrestler Undertaker) यास पराभूत केले नव्हते, उलट ब्रायन ली (Brian Lee) ने अंडरटेकरची भूमिका केली होती. यावेळी माजी WWE रेसलर अंडरटेकरने अक्षयच्या या पोस्टवर कमेंट करून त्याला चॅलेंज केले आहे. अंडरटेकरने म्हटले आहे, जेव्हा कुस्तीसाठी तयार असशील तेव्हा मला सांग. यावर अक्षयने गंमतीने म्हटले आहे की, भावा माझा विमा पाहून सांगतो…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

विशेष बाब ही आहे की, अक्षय कुमारची ही पोस्ट बघता-बघता सोशल मीडियावर वायरल झाली आणि चाहत्यांनी मार्क विल्यम कॅलावे यास टॅग करण्यास सुरूवात केली. मार्क विल्यम कॅलावे (Mark William Callaway) हाच ’द अंडरटेकर’च्या नावाने सुद्धा ओळखला जातो.

अक्षयच्या या पोस्टबाबत काही लोकांचे म्हणणे आहे की,
पुन्हा एकदा कुस्ती झाली तर या निमित्ताने अंडर टेकरचे सुद्धा पुनरागमन होईल.
काही लोक म्हणत आहेत की, अंडरटेकर आता म्हातारा झाला आहे,
यासाठी अक्षय कुमार आता त्याला पराभूत करू शकतो. कारण अक्षय कुमारने मार्शल आर्ट सुद्धा शिकले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Akshay Kumar | akshay kumar had been fooling people for 25 years the truth

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी 7 दिवस क्वारंटाईन अनिवार्य, RT-PCR चाचणी होणार 3 वेळा

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

Related Posts