IMPIMP

SMS Email Alert | तुम्हाला सुद्धा आला असेल ‘हा’ SMS किंवा ई-मेल तर व्हा सावध; अन्यथा बुडतील तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

by nagesh
alert if you have received lucky winner sms email or call then wake up

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SMS Email Alert | केंद्र सरकारने ट्विट करून अशाप्रकारचे मेसेज आणि ई मेलपासून (SMS Email Alert) सावध राहण्यास सांगितले आहे. मोदी सरकारच्या नावाने अनेक बनावट लॉटरी स्कॅम चालवले जात आहेत. हे सायबर गुन्हेगार लोकांना लकी विनर असल्याचा मेसेज पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत आणि त्यांच्या खात्यातील सर्व पैसे काढत आहेत. जर तुम्हाला सुद्धा लॉटरीसंबंधी मेसेज, ईमेल किंवा कॉल आला तर सावध व्हा.

भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने अशाप्रकारे लॉटरी घोटाळ्यापासून सावध राहण्यास सांगितले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

PIB ने केले ट्विट
अशा बनावट लॉटरी सबंधीचे मेसेज, कॉल आणि ईमेलच्या (SMS Email Alert) बाबतीत सावध रहा. हा सायबर गुन्हेगारांचा आर्थिक फसवणुकीसाठीचा प्रयत्न असतो. हा #PIBFacTree पहा आणि स्वताचा बचाव करा. सायबर गुन्हेगारांद्वारे अशी लॉटरी जिंकल्याचा फोन कॉल/ईमेल/एसएमएस आला तर ताबडतोब सतर्क व्हा.

पीआयबीने लोकांना दिला सल्ला
#PIBFactCheck मध्ये म्हटले आहे की, आपली वैयक्तिक माहिती, बँक डिटेल इत्यादी कुणासोबतही शेयर करू नका. स्पाम किंवा नेको असलेले मेल ताबडतोब डिलिट करा. कोणत्याही बनावट बातमीला बळी पडल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

तुम्ही सुद्धा करू शकत फॅक्टचेक
जर तुम्हाला सुद्धा असा एखादा मेसेज मिळाला तर तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ अथवा व्हॉट्सअप नंबर +918799711259 किंवा ईमेल : [email protected] वर पाठवू शकता. ही माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.inवर सुद्धा उपलब्ध आहे.

Web Title :- alert if you have received lucky winner sms email or call then wake up

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील मंगळवार पेठेत बारमध्ये घुसून गुंडांचा ‘राडा’

Pune Crime | पुण्यात हप्ता देण्यावरुन दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

Pune Crime | मांजा गळ्याला अडकून मोटारसायकलस्वार जखमी; मुंबई -पुणे महामार्गावरील सीएमई गेटसमोर घडला प्रकार

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

Related Posts