IMPIMP

Alia Bhatt | आलिया भट्टनं सैफ अली खानच्या मुलाला केलं ‘रिजेक्ट’ ! केली रणवीरची निवड, पाहा व्हायरल Video

by nagesh
Alia Bhatt | alia bhatt recreating kareena kapoor poo from k3g as kabhi khushi kabhi gham completed 20 years

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Alia Bhatt | बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. काही गाजलेल्या चित्रपटांमधले डायलॉग देखील प्रसिद्ध झाले असून, अजूनही चाहते त्याच उत्साहानं त्याला पसंती दर्शवतात. त्यातीलच एक खास चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhi Gum).’ ‘कभी खुशी कभी गम’ (K3G) या चित्रपटाचा चाहते वर्गदेखील असंख्य आहे. (Alia Bhatt)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan), काजोल (Kajol), ऋतिक रोशन (Hritik Roshan), करीना कपूर (Kareena Kapoor), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. तर करीना कपूरची स्वतःला मोठी म्हणून फॅन म्हणून घेणारी, आलिया भट्टनं या चित्रपटांमधील एका प्रसिद्ध डायलॉगवर व्हिडिओ बनवला आहे. ‘कभी खुशी कभी गम’मध्ये करीना कपूरनं ‘पू’ हे पात्र साकारलं होतं.

आलिया भट्टनं (Alia Bhatt) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हूबेहूब ‘पू’ची नक्कल केली आहे. तिनं चित्रपटांमधील पु या पात्राचा प्रोम नाईटसाठी डेट निवडतानाचा सीन अगदी हुबेहूब तयार केला आहे. यामध्ये डेट नाईटसाठी मुलं निवडताना तिनं चक्क सैफ अली खानच्या मुलाला रिजेक्ट केलं आणि रणवीर सिंगला सिलेक्ट केलं आहे. दरम्यान, ऋतिकचे डायलॉग रणवीर सिंग म्हटले आहेत. आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर तिच्या चाहत्यांनी मात्र तिच्या अभिनयाला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, आलिया आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) त्यांच्या आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तसेच त्यांच्यासोबत या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी असं जेष्ठ कलाकार मंडळी देखील दिसणार आहेत. आलिया आणि रणबीर कपूर देखील ‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra) या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

Web Title :- Alia Bhatt | alia bhatt recreating kareena kapoor poo from k3g as kabhi khushi kabhi gham completed 20 years

हे देखील वाचा :

Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Related Posts