IMPIMP

Alia Bhatt Hollywood Debut | अभिनेत्री आलियाचा पहिल्याच हॉलीवुड चित्रपटातील मुलाखतीमधील वागणुकीवरुन होत आहे ट्रोल; नेटकरी बोलत आहे ‘घरी जा’

by nagesh
Alia Bhatt Hollywood Debut | alia bhatt trolled for her body language in heart of stone interview video viral

सरकारसत्ता ऑनलाईन –  बॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता हॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करत आहे. (Alia Bhatt Hollywood Debut) अभिनेत्री आलियाचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) हा चित्रपट पहिला हॉलीवुडपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये आलिया सोबत अभिनेता जेमी डोर्नन (Jamie Dornan) व गॅल गॅडोट (Gal Gadot) हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. हार्ट ऑफ स्टोन बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सिनेमाची टीम जोरदार प्रमोशन देखील करत आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt Hollywood Debut) देहबोलीवर तिला ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी तिला घरी बसा असा टोला लगावला आहे.

 

 

 

आलिया हॉलीवुडमध्ये (Alia Bhatt International Interview) आपली ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र तिच्या पहिल्याच चित्रपटातील प्रमोशनमध्ये (Heart Of Stone Promotion) आलियाचे वागणे लोकांना पटले नसून जागतिक स्तरावर रिप्रेझेन्ट करताना अशा चूका करु नयेत अशी लोकांची भावना आहे. (Alia Bhatt Body language In Interview) प्रमोशनमध्ये चालू असलेल्या मुलाखतीमध्ये आलिया खूप वेळ केसांशी खेळत आहे. अनेकदा ती केसांमध्ये हात घालून बसलेली दिसली असून हेअर स्टाईल चेंज करताना दिसत आहे. तसेच आलिया बोटातील अंगठी काढून प्रत्येक बोटात घालून बघत आहे. अभिनेत्री गॅल गॅडोट बोलत असताना आलिया सतत या गोष्टी करत असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष देखील होत आहे. या मुलाखतीमध्ये बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्टची देहबोली चूकीची असून ती सतत पाय हालवत आहे. तिची ही मुलाखतीची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लोक तिला कमेंट करुन सुनावत आहे.

 

 

 

आलियाच्या या व्हिडिओ खाली कमेंटस् चा पाऊस पडतो आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, आलियाची तुझी देहबोली अत्यंत चुकीची असून तू आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी वागत आहेस. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, तुझ हे केसाला हात लावणे आधी थांबव, खूप मळमळ होत आहे. तर एका युजरने आलियाला तू घरी जा अशी शब्दात कमेंट केली आहे. अनेकांना आलियाचे वागणे आवडले नसून अतिशय अनप्रोशेनल बिहेव्हियर आहे. देशातील ॲक्टर बाहेर कसे रिप्रेझेन्ट करत आहेत या निगेटीव्ह कमेंट आलिया भट्टाच्या आंतरराष्ट्रीय मुलाखतीला. (Alia Bhatt Hollywood Debut) मिळत आहेत.

 

 

 

Web Title : Alia Bhatt Hollywood Debut | alia bhatt trolled for her body language in heart of stone interview video viral

Related Posts