IMPIMP

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’, आनंदी झाला करण जौहर; कपूर कुटुंबात उत्सव

by nagesh
Alia Bhatt-Ranbir Kapoor | alia bhatt and ranbir kapoor announce pregnancy welcome first child karan johar reacts

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Alia Bhatt-Ranbir Kapoor | अभिनंदन! कपूर कुटुंबात लवकरच बाळाच्या रडण्याचा आवाज गुंजणार आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे. बॉलीवूडचे सर्वात लाडके जोडपे रणबीर आणि आलिया आता आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री आलियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Alia Bhatt-Ranbir Kapoor)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कपूर कुटुंबात येणार एक छोटा पाहुणा…
आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर तिच्या गरोदरपणाची गोड बातमी शेअर करताच चाहते आनंदी झाले आहेत. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण यावेळी आनंदी झाले आहेत.

व्हायरल आहे आलियाची प्रेग्नेंसी पोस्ट
आलिया भट्टची प्रेग्नेंसीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तिची सोनोग्राफी होत आहे. संगणकाच्या स्क्रीनवर ब्लर करून तिने हार्ट इमोजी दाखवला आहे. (Alia Bhatt-Ranbir Kapoor)

बाळाला स्क्रीनवर पाहिल्यानंतर आलियाला अतिशय आनंद झाला आहे. आलियाच्या जवळही कोणीतरी बसले आहे. त्याची पाठ दिसत आहे. आलियाच्या शेजारी बसलेली व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट झाले नसले तरी तो रणबीर कपूरसारखा दिसत आहे.

करण आहे अतिशय आनंदी
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीमुळे करण जोहर आनंदी आणि उत्साहित आहे, याचा अंदाज त्याच्या प्रतिक्रियेवरून तुम्ही लावू शकता. करणने आलियाच्या पोस्टवर कमेंट केली आहे. करण जोहरने लिहिले – हार्ट इज बर्स्टिंग. यासोबत त्याने अनेक हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

करण व्यतिरिक्त, रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर हिने देखील तिच्या भावावर हार्ट इमोजीसह प्रेमाचा वर्षाव केला आहे. मौनी रॉय, टायगर श्रॉफसह सर्व सेलिब्रिटी आणि चाहते या आनंदाच्या प्रसंगी आलिया आणि रणबीरचे अभिनंदन करत आहेत.

आलियाच्या आईची प्रतिक्रिया हृदयस्पर्शी
आलिया भट्टची आई आजी झाल्यामुळे खूप आनंदी आहे. या खास प्रसंगी तिने आपल्या मुलीवर आणि जावयावर प्रेमाचा खूप वर्षाव केला आहे.
सोनी राजदानने आलियाच्या पोस्टवर कमेंट केली – Congratulations Mama and Papa lion ❤️❤️❤️. आलियाच्या आईची प्रतिक्रिया हृदयस्पर्शी आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावर्षी एप्रिल महिन्यात विवाहबद्ध झाले होते.
या जोडप्याच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते.
लग्नाच्या काही महिन्यांनंतर आलियाने मोठी खुशखबर देऊन सर्वांना खुश केले आहे.
या खास प्रसंगी आम्ही देखील आलिया आणि रणबीरला खूप खूप शुभेच्छा देतो!

Web Title :- Alia Bhatt-Ranbir Kapoor | alia bhatt and ranbir kapoor announce pregnancy welcome first child karan johar reacts

हे देखील वाचा :

ED Summons Sanjay Raut | शिवसेनेला आणखी एक धक्का ! संजय राऊतांना ईडीचे समन्स

Pune Crime | किराणा दुकानदारांशी महिलेची बनवाबनवी ! इतर सामानाबरोबर पैसे देण्याचा बहाणा करुन फसवणूक

MLA Ashish Jaiswal | ‘तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाहीत, मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय?’; शिंदे गटातील आमदाराचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Related Posts