IMPIMP

amarnath yatra | कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही अमरनाथ यात्रा रद्द

by bali123
amarnath yatra canceled for second year in a row due to covid 19

सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनाच्या तिस-या लाटेच्या (third wave of the corona) पार्श्वभूमीवर यंदाही अमरनाथ यात्रा रद्द (Amarnath Yatra canceled) केली आहे. अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी (Amarnathji Shrine Board) ही यात्रा रद्दची घोषणा केली आहे. दरम्यान यात्रा रद्द झाली तरी भाविकांसाठी 28 जूनपासून बोर्डाने सकाळ अन् संध्याकाळच्या आरतीच थेट प्रक्षेपण आणि व्हर्च्युअल दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यात्रा होणार नसली तरी प्रथेप्रमाणे या ठिकाणी पारंपारिक विधी पाडले जाणार असल्याचे जम्मू काश्मीरच्या प्रशासनाने (Jammu and Kashmir administration) स्पष्ट केले आहे. amarnath yatra canceled for second year in a row due to covid 19

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , facebook page for every update

हिमालयाच्या उंच उंच भागात 3880 मीटर उंचीवर असलेल्या भगवान शिवच्या गुफा मंदिरात 56 दिवसाठी यात्रा 28 जून रोजी पहलगाम व बालटालमार्गे सुरू होणार होती आणि 22 ऑगस्टला संपणार होती. यापूर्वी एप्रिल महिन्यात अमरनाथजी श्राईन बोर्डाने पवित्र गुफेची यात्र रद्द करणार असल्याचे म्हटले होते. याबाबत पत्रकही जारी केले होते. परंतु काही वेळानेच जम्मू काश्मीर माहिती संचालनालयाने यात्रा रद्द करण्याचा आदेश मागे घेतला होता. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात.

Web Tital : – amarnath yatra canceled for second year in a row due to covid 19

Related Posts