IMPIMP

Amazon Scam | ॲमेझॉनच्या 8,546 कोटी भ्रष्टाचाराचा पंतप्रधानांनी देशाच्या जनतेसमोर खुलासा करावा (व्हिडिओ)

by nagesh
Amazon Scam | The Prime Minister should expose the 8,546 crore corruption of Amazon to the people of the country

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  :अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) 8,546 कोटी खर्च केला आहे. थेट परकिय गुंतवणुकीचा (Foreign investment) बेकायदेशिर कारभार ॲमेझॉन कंपनी (Amazon Scam) करीत आहे. या बेकायदेशिर कारभाराला भाजप सरकार पाठिंबा देत आहे. या धोरणामुळे जवळपास 8 लाख छोटे व्यापारी व दुकानदारांचे धंदे बंद होणार आहे. या 8,546 कोटीच्या ॲमेझॉन भ्रष्टाचाराची (Amazon Scam) सर्वोच्च्य न्यायालयातील (Supreme Court) न्यायमूर्तीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांनी केली आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole), अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस सोनल पटेल (Sonal Patel), महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) व आरिफ नसिम खान, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishwajeet Kadam), पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagwe) व प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) उपस्थित होते. (Amazon Scam)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एच. के. पाटील पुढे म्हणाले, लाखो देशवासियांच्या त्यागामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी, कामगार आणि सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे. केंद्रातील भाजप सरकार (BJP government) सत्तेत आल्यावर निरगुंतवणुकीच्या नावाखाली सरकारी मालमत्ता काही मुठभर उद्योगपतींना विकत आहे. धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये तेढ निर्माण करीत आहे. या सरकारच्या चूकीच्या आर्थिक धोरणामुळे जनतेचे कंबरडे मोडले जात आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरूध्द काळे कायदे काढले आहे. या कायद्याच्या विरूध्द शेतकरी गेले वर्षभर आंदोलन करीत आहे तरीही केंद्र सरकार या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे अनेक कोरोना रूग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे पाटील म्हणाले.

एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप नॅशनल मॉनीटायझेशन पाईपलाईन (National Monetization Pipeline)

सरकारी कंपन्यांची (government companies) मालमत्ता एकूण 6 लाख कोटी आहे. ही मालमत्ता गेल्या 70 वर्षात देशातील जनतेने केलेल्या श्रमाचे फळ आहे. ही मालमत्ता नॅशनल मॉनीटायझेशन पाईपलाईनच्या नावाखाली केंद्रातील भाजप सरकार त्यांच्या काही मूठभर मित्र उद्योगपतींना विकत आहे.

लखीमपूर खेरी घटना (Lakhimpur Kheri incident)
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी या ठिकाणी शेतकरी शांतीने काळ्या कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत असताना भाजपच्या मंत्र्यांच्या मुलानी जाणून बुजून त्या शेतकऱ्यांवर आपली गाडी धडकवली व त्यात काही शेतकरी मृत्यूमुखी पडले. या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी व त्या मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी कुटूंबियांचे सात्वंन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) लखीमपूर खेरीला जात असताना त्यांना अटक (Arrest) करून स्थानबध्द करण्यासात आले. पोलीसांचे बळ वापरून लोकांची गळचेपी करण्याचे काम उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार करीत आहे. आम्ही या देशाला पोलीसराज होऊ देणार नाही.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढ (Petrol, diesel and domestic gas price hike)
गेले 2 वर्ष केंद्र सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करीत आहे.
या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला टेकले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे.
देशातील आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. गेल्या 74 वर्षात अशी बिकट परिस्थीती देशाने कधीही पाहिली नाही.
जी. डी. पी. सातत्याने घसरत चाललेला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यावर 14 कोटी युवक बेरोजगार झाले आहे.
केंद्र सरकारने गेल्या 7 वर्षात किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या याचा तपशिल द्यावा.

मोदी सरकारने खालील प्रश्नांची उत्तरे द्यावी.

1. कुठल्या राज्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना व राजकीय पक्षांना ॲमेझॉनकडून ८,५४६ कोटींचा फायदा झाला?

2. हे पैसे परकिय गुंतवणुकीचे नियम बदलण्यासाठी दिले होते का? यामुळे छोटे दुकानदार व व्यापाऱ्यांचे व MSMEs चे धंदे बद होणार आहे.

3. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या वरिल भ्रष्टाचारावर मौन बाळगुन आहेत. त्यांनी या भ्रष्टाचाराबद्दल देशाच्या जनतेसमोर खुलासा करावा.

Web Title :- Amazon Scam | The Prime Minister should expose the 8,546 crore corruption of Amazon to the people of the country

हे देखील वाचा :

Digital Media | मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांच्याकडून डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही

Nagpur ZP Election Results | नागपूर जि.प.च्या सर्व 16 जागांचे निकाल हाती; काॅग्रेसची बाजी, भाजपला ‘दणका’

Nagpur ZP Election | देवेंद्र फडणवीस अन् नितीन गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का ! काँग्रेसचं वर्चस्व, 9 जागांवर दणदणीत विजय

Related Posts