IMPIMP

Amit Raj Thackeray At Bhau Rangari Ganpati | अमित राज ठाकरे यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन (Videos)

Amit Raj Thackeray - Punit Balan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Amit Raj Thackeray At Bhau Rangari Ganpati | शहरात विविध सार्वजनिक मंडळातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) बाप्पाच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येत आहेत.

दरम्यान, मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष युवा नेतृत्व अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्याकडून अमित ठाकरे यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान करण्यात आला.

शहरात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. वैशिष्टपूर्ण गणेशमूर्ती आणि भव्य-दिव्य सजावट हे पुण्यातील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र असतं. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात पुण्याचे वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.