IMPIMP

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

by nagesh
Amit Shah | shraddha murder case delhi police will ensure strictest punishment for shraddhas killer amit shah on aftab poonawala

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – वसईतील श्रद्धा वालकर या 27 वर्षीय तरुणीचा दिल्लीत तिच्या प्रियकराने निर्घूण खून केला. तिच्या शरीराचे त्याने 35 तुकडे करुन जंगलात फेकले. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशात गाजत आहे. न्यायालयाने सध्या खुनी आफताबला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याची नार्को चाचणी देखील करण्यात येणार आहे. त्यावर आता गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धाच्या मारेकऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येईल, असे अमित शहा (Amit Shah) म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमित शहा (Amit Shah) दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल, त्याला सध्याच्या स्थितीत कायद्यानुसार कठोरातील कठोर शिक्षा होईल, याची काळजी दिल्ली पोलीस आणि सरकारी पक्ष नक्की घेईल.अमित शहा यांनी पहिल्यांदाच श्रद्धा प्रकरणावर भाष्य केले आहे.

आफताब पूनावाला याने आपण रागाच्या भरात श्रद्धाचा खून केल्याचे न्यायालयात कबूल केले आहे.
श्रद्धा आणि आफताब यांच्यात मुंबईत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ते दिल्लीत राहण्यास गेले.
तेथे त्यांच्यात सतत वाद होत होते. आफताब हत्येपूर्वी देखील श्रद्धाला मारहाण करत होता.
त्याने अनेकवेळा श्रद्धाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. एके दिवशी असाच वाद झाला आणि आफताबने
श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या शरीरारचे 35 तुकडे केले. त्याने कोणाला संशय येऊ नये यासाठी
मोठा फ्रिज विकत घेतला आणि त्यात त्याने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवले. त्यानंतर तो रोज रात्री काही तुकडे
जंगलात नेऊन टाकत होता. आफताब काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली गेली.
त्यानंतर आफताब आणि त्याच्या कुकर्माचा शोध लागला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Amit Shah | shraddha murder case delhi police will ensure strictest punishment for shraddhas killer amit shah on aftab poonawala

हे देखील वाचा :

BJP Vs Congress In Maharashtra | भाजपच्या दोन दिग्गजांमध्ये बेबनाव…, काँग्रेस नेत्याचं विधान

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘एकीकडे गुजरात उद्योग आणि कर्नाटक गावं पळवत असताना मुख्यमंत्री मात्र तंत्रमंत्रात अडकले’ – संजय राऊत

FIFA World Cup 2022 | घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने गोल करताच ‘हा’ विश्वविक्रम होणार त्याच्या नावावर

Related Posts