IMPIMP

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

by nagesh
 Amruta Fadnavis | amruta fadnavis slams nana patole over his statement about pm narendra modi

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Amruta Fadnavis | ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं खळबळजनक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलं. हे वादग्रस्त विधान पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी केल्याने राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. पटोलेंच्या विधानावरून आता भाजप (BJP) जोरदार आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससह (Devendra Fadnavis) अनेक भाजप नेत्यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे. यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पटोले यांच्या विधानावर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली भुमिका मांडली आहे. अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांत ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस म्हणाल्या, “सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले”, अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं, असा दावा करण्यात येत आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ‘मोदींना मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असं विधान पटोले यांनी केलं होतं. याच विधानावरुन भाजप आक्रमक झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Amruta Fadnavis | amruta fadnavis slams nana patole over his statement about pm narendra modi

हे देखील वाचा :

Best Business Ideas | गावातील लोकांनी कमी खर्चात सुरू करावेत हे 7 उद्योग, कमी वेळात होईल मोठी कमाई; जाणून घ्या

One-Time Pension | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘वन-टाइम पेन्शन’ पर्याय ! आता NPS नाही तर OPS अंतर्गत मिळणार, जाणून घ्या

Online Portal for Pension Complaint | पेन्शनर्ससाठी सरकारने बनवले पोर्टल ! आता पेन्शनसंबंधी तक्रारी तात्काळ होतील दूर, जाणून घ्या पद्धत

Related Posts