IMPIMP

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी’, लवकरच येतंय अमृता फडणवीसांचं नवं गाणं

by sikandershaikh
amruta-fadnavis

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना संगीत आणि गाण्याची किती आवड आहे सर्वांना माहितीच आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची काही नवीन गाणी सर्वांच्या भेटीला आली होती. भाऊबीजेच्या निमित्तानं एक आणि वॅलेंटाईन डे च्या निमित्तानं एक गाणं त्यांनी रिलीज केलं होतं. काहींनी त्यांचं कौतुक केलं होतं. तर काहींनी मात्र त्यांच्या गाण्यावर टीकाही केली होती. आता महिला दिनाच्या निमित्तानं त्यांचं आणखी एक गाणं रिलीज होणार आहे. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी असं हे गाण आहे. 8 मार्च रोजी महिला दिनी हे गाणं रिलीज होणार आहे. ट्विट करत अमृता फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी काही खास फोटोही शेअर केले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये अमृता (amruta fadnavis) म्हणतात, जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी. तिन मात्र जगाला दाखवून दिलं की, तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणं शक्य नाही. स्त्री शक्तीला गौरवान्वित करणारं माझं नवीन गीत. नक्की पहा. 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी.

अमृता यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीत त्यांचं नवीन गाणं सर्वांच्या भेटीला आलं होतं.
भाऊबीजेच्या निमित्तानं आलेलं त्याचं हे गाणं समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
इतकंच नाही तर अनेकांनी अमृता यांच्यावर टीका केली होती.
यानंतर आता पुन्हा एकदा वॅलेंटाईन डे च्या निमित्तानं त्यांनी आणखी एक गाणं रिलीज केलं होतं.
ये नयन डरे डरे असं या गाण्याचं नाव होतं.
आशिष पांडा यांनी हे गाणं डायरेक्ट केलं आहे.
24 तासात या गाण्याचा व्हिडीओ 47 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला होता.

अजित पवारांनी मांडला राज्याच्या तिजोरीचा ‘लेखाजोखा’ !

Related Posts