IMPIMP

Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण… , त्यांच्या विधानाचा नेहमी चुकीचा अर्थ घेतला जातो’ – अमृता फडणवीस

by nagesh
Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari |amruta fadnavis reaction on bhagat singh koshyari statement regarding shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या राज्यात वाद सुरु आहेत. अनेक नेते आणि पक्षांनी राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. ”राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, पण दरवेळी त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो.” असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. (Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ”महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे राज्यातील एकमेव राज्यपाल आहेत, ज्यांनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकली आहे. त्यांचे महाराष्ट्र आणि मराठी माणसांवर खूप प्रेम आहे. मी स्वत: ते अनुभवले आहे. मात्र, अनेकवेळा त्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. यापूर्वी देखील अनेकवेळा असे घडले आहे. त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, हे निश्चित”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांनी राज्यपालांना परत बोलवा, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेने तर राज्यपालांची बदली केली नाही किंवा त्यांना पदावरून हटवले नाही, तर आगामी काळात महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे.
तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी आणि पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पदावरून हटविण्याची मागणी पत्राद्वारे पक्षाला केली आहे.
त्यामुळे केंद्रीय पक्षश्रेष्ठी राज्यपालांवर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यपाल कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा करणार आहेत.
त्यामुळे या दौऱ्यात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari |amruta fadnavis reaction on bhagat singh koshyari statement regarding shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Related Posts