IMPIMP

Andheri East by Election | शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाची पहिली परीक्षा, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Andheri East by Election | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला होता. पक्षात पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्ष आणि पक्ष चिन्हावरून निवडणूक आयोगापासून (Central Election Commission) न्यायालयापर्यंत लढाई सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Shiv Sena MLA Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे (Andheri East by Election) सर्वांचे लक्ष लागले होते. आता या निवडणुकीसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अंधेरी पूर्व विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दोन्ही गटासाठी ही पहिली परिक्षा मनाली जात असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा (Andheri East by Election)
कार्यक्रम आज जाहिर केला आहे. या कार्यक्रमानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर
रोजी मतदान (Voting) होणार आहे.
तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
निवडणूक आयोगासमोर शिंदे गट आणि शिवसेनेत पक्षचिन्हावरुन वाद असताना ही निवडणूक जाहीर झाल्याने
या निवडणुकीपुर्वी धनुष्यबाण याबाबत (Dhanushyaban Symbol) निर्णय होणार का,
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title :- Andheri East by Election | shivsenas first exam in mumbai after the split andheri east assembly by election announced the whole program is as follows

हे देखील वाचा :

IND vs SA 2nd T20 | गुवाहाटीत झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नावावर झाली ‘या’ विक्रमाची नोंद

Girish Mahajan | एकनाथ खडसेंच्या BJP प्रवेशाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले – मी, फडणवीस, खडसे एकत्र…

Ind vs SA T20 | चक्क अम्पायरच नियम विसरले, गुवाहाटीत अम्पायर्सने केली ‘ही’ मोठी चूक

Related Posts