IMPIMP

Anil Bonde | भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन महिने कारावासाची शिक्षा, जाणून घ्या!

by nagesh
MP Anil Bonde | ...So Rahul Gandhi and Ravana have more in common, eat. Commentary by Anil Bonde

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन Anil Bonde | 2016 साली नायब तहसीलदार यांच्यासोबत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकरणामध्ये भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना शिक्षा सुनावली आहे. बोंडेंना अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने (Amravati District Sessions Court) तीन महिन्यांचा साधा कारावास आणि 20 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वरूड (Warud) तालुक्यामधील श्रावण बाळ योजना (Shravan Bal Yojana) आणि संजय गांधी निराधार योजनांच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) अनेक लाभार्थ्यांना काही शुल्लक त्रुटींवरून त्रास देत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी अनिल बोंडे तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी या दोन्ही योजनांचं काम नायब तहसीलदार नंदकिशोर काळे (Nandkishor Kale) यांच्याकडे होतं. बोडेंनी याबाबत त्यांना विचारणा केल्यावर 240 प्रकरणांमध्ये त्रुटी आढळून आल्याची समजलं, काळे यांनी कागदपत्रांसोबत पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक असल्याचं सांगितलं आणि बोंडे आणि काळे यांच्यामध्ये वाद झाला.

अनिल बोंडे आणि नंदकिशोर काळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली या चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. बोंडे यांनी काळे यांना मारहाण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना हा वाद मिटवला. मात्र त्यानंतर कर्मचारी आणि अधिकारी संतापले त्यांनी वरुड पोलीस स्टेशनमध्ये (Warud Police Station) जात बोंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. तेव्हा कलम 353, 332, 504 आणि 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणावर आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. अडकड यांनी डॉ. अनिल बोंडे
यांना कलम 332 अंतर्गत तीन महिन्यांचा साधा कारावास आणि 10 हजार रुपये दंड तसेच कलम 504 अंतर्गत तीन महिने साधा कारावास
आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. यावेळी डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांना जामीनदेखील मंजूर करण्यात आला.
या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात (Supreme Court) दाद मागणार असल्याचे बोंडेंनी सांगितलं.

Web Title :- Anil Bonde | bjp leader dr anil bonde sentenced to three months imprisonment

हे देखील वाचा :

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

Pune Crime | लग्नानंतर अचानक भेटली प्रेयसी अन् बहरलं जुनं प्रेम ! पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर घडलं असं काही की इंजिनियर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल…

Overconsumption Of Protein | प्रोटीनचे जास्त सेवन करू शकते नुकसान, जाणून घ्या याचे साईड इफेक्ट

Related Posts