IMPIMP

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukhs stay in jail despite bail high court extended the stay on bail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया (Surgery) करण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज कोर्टात सादर करण्यात आला होता. अनिल देशमुख यांच्या या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने देशमुख यांना परवानगी नाकारली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना खांदेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे (Mumbai Sessions Court) केली होती. दरम्यान, आजच्या सुनावणीत न्यायालयाने अनिल देशमुख यांना झटका दिला आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयातच (J.J. Hospital) उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. उपचार करताना घरातील एक व्यक्ती देशमुख यांच्यासोबत उपस्थित असणार आहे, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे.
त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे केली होती.
पण, ईडीनं (ED) याला विरोध केला होता. देशमुखांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, असा अहवाल ईडीने कोर्टात सादर केला होता.
त्याचबरोबर खासगी ऐवजी जेजेतही ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असा दावाही ईडीने केला होता.

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh not relieved by court treatment at jj hospital orders from court

हे देखील वाचा :

Maharashtra Local Body Election | महाराष्ट्रातील महापालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधी होणार ? 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय

Uric Acid Level | यूरिक अ‍ॅसिडच्या रूग्णांनी आपल्या खाण्या-पिण्याची घेतली पाहिजे विशेष काळजी, पहा खाद्यपदार्थांची यादी

Gold Silver Price Today | सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! आठवडाभरात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची मोठी घट; जाणून घ्या

Related Posts