IMPIMP

Anil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court | भ्रष्टाचार प्रकरण ! अनिल देशमुखांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला

by nagesh
Anil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनAnil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. सध्या तुरुंगात असलेल्या देशमुख यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, सीबीआयने 60 दिवसांच्या अनिवार्य कालावधीत आरोपपत्र दाखल केले नाही आणि नंतर सीबीआयने अपूर्ण आरोपपत्र दाखल केले.
तसेच सीबीआयने आरोपपत्रासह संबंधित कागदपत्रे सादर केली नसून ती निर्धारित मुदतीनंतर सादर करण्यात आली,
या कारणास्तव या तिघांनी न्यायालयाकडे जामीन मागितला होता.
परंतु, सीबीआयने या युक्तिवादांना विरोध करत विहित मुदतीत आरोपपत्र दाखल केल्याचे म्हटले.

फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 अन्वये आरोपीला अटक केल्यापासून 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करावे लागते.
मात्र, जर 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही, तर आरोपींना डिफॉल्ट जामीन मिळू शकतो.

100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर केला होता.
या आरोपाखाली सीबीआयने गेल्या महिन्यात देशमुखांवर आरोपपत्र दाखल केले होते.

मुंबई शहरातील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट गेल्या वर्षी मार्चमध्ये देशमुख यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिले होते,
असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, देशमुख यांनी हा आरोप फेटाळला होता.
परंतु मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुखांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिल्यानंतर देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Web Title :- Anil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Bail Plea Rejected By CBI Court

हे देखील वाचा :

High Cholesterol Diet | ‘हे’ 4 ड्रिंक्स करू शकतात कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यात मदत!

BJP To Maharashtra State Election Commission | नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी

Heart Disease | आठवड्यातून 2 दिवस करा ‘या’ फळाचे सेवन, कमी होऊ शकतो हार्ट अटॅक-फेल्युअरचा धोका

Related Posts