IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगातच, CBI न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची दिवाळी तुरूंगातच जाणार आहे. कारण त्यांचा जामीन अर्ज (Bail Application) सीबीआय न्यायालयाने (CBI Court) फेटाळला आहे. मागील आठवड्यात हायकोर्टाने देशमुखांना (Anil Deshmukh) जामीन मंजूर केल्याने आजच्या सुनावणीत जामीन मिळून ते दिवाळीसाठी घरी येतील असे, वाटत होते. परंतु, सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देशमुख अकरा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. ईडीने (ED) दाखल केलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात त्यांना मागील आठवड्यात हायकोर्टात जामीन मंजूर करण्यात आला. मात्र आज सीबीआयच्या गुन्ह्यात जामीन न मिळाल्याने देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

हृदयविकाराने त्रस्त असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी देशमुखांनी (Anil Deshmukh) मुंबई सत्र न्यायालयाकडे (Bombay Sessions Court) केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात (Jaslok Hospital) उपचार सुरु आहेत.

देशमुखांवर चार दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
देशमुख यांचा जामीन अर्ज जवळपास सात महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत मुंबई हायकोर्टाला लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करून निर्णय देण्याचे निर्देश दिले होते.

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी देशमुख यांच्यावर मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट
मालकांकडून खंडणी (Extortion Case) वसुली केल्याचा आरोप केला होता.
यानंतर मुंबई हायकोर्टाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचा आदेश दिला आणि प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीनेही अनिल देशमुख तसेच त्यांचा स्वीय सचिव संजीव पलांडे
(Sanjeev Palande) व स्वीय सहायक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना अटक केली.
मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी म्हणून उकळलेली चार कोटी रुपयांहून जास्त रक्कम देशमुख
यांनी नागपूर येथील त्यांच्या शिक्षण संस्थेत वळवून मनी लॉन्ड्रिंग केले, असा आरोप ईडीने ठेवला आहे.
याप्रकरणी ईडीने त्यांच्यासह अन्य आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्रही दाखल केले आहे.

Web Title :-  Anil Deshmukh | former maharashtra minister anil deshmukh bail plea rejected by cbi court rs 100 crores extortion scam

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा अडचणीत, अटक होणार?

India vs Pakistan | भारत- पाक सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संपर्क टाळण्यासाठी पोलीस सावध

Related Posts