IMPIMP

Anil Parab | शरद पवारांसोबत 4 तास चर्चा झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत अनिल परबांची माहिती; म्हणाले…

by nagesh
 Anil Parab | four hours discussion transport minister anil parab and sharad pawar over st employee strike

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Anil Parab | एसटी महामंडळाचे (MSRTC) सरकारी सेवेत विलिनीकरण करावे यासाठी एसटी कामगारांचे राज्यव्यापी संप (ST workers strike) सुरु आहे. न्यायालयाने आणि राज्य सरकारने दिलेल्या सुचनानंतरही संप कायम ठेवण्यात आला आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षांचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पुढाकार घ्यावा लागला आहे. झालेल्या बैठकीतील माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

शरद पवारांच्या उपस्थित आज (सोमवारी) बैठक पार पडली. त्यावेळी परिवहनमंत्री अनिल परबसह (Anil Parab) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीला तोडगा काढावा असा निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याबाबत अनिल परब यांनी सांगितले की, ‘गेले काही दिवस एसटीचा संप सुरू आहे. एसटीच्या संपामुळे अनेकांचे हाल होत आहेत. आज शरद पवार यांनी मला या संदर्भात बोलावलं होतं. त्यांनी आमच्याकडून सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर काय मार्ग निघू शकतात, त्यावर चर्चा केली. तसेच, एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एसटीची आताची आर्थिक परिस्थिती, भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्यासाठी करायच्या उपाय योजनांसह इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली.

आजच्या बैठकीत वेतन वाढीसंदर्भातही चर्चा झाली, येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईलच.
त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर या विषयावर चर्चा होईल. आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती,
ती आम्ही त्यांना दिली. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे.
बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांवरही चर्चा आज केली आहे.
राहिला विषय एसटीच्या विलीनीकरणाचा, तर तो मुद्दा उच्च न्यायालयाच्या (High Court) समितीसमोर आहे.
कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार, असं अनिल परब (Anil Parab) म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Anil Parab | four hours discussion transport minister anil parab and sharad pawar over st employee strike

हे देखील वाचा :

Maharashtra Primary Schools Reopen | ‘पहिलीपासून शाळा सुरु होणार, पण…’, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Rains | पुढील 48 तासात राज्यात बरसणार पावसाच्या सरी, पुण्यासह 11 जिल्ह्यांना IMD चा इशारा

Hingoli News | धक्कादायक ! रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी; जवानाचा मृत्यू

Related Posts