IMPIMP

Anil Parab | अनिल परबांचं मोठे विधान; म्हणाले – ‘एसी कामगारांना 4 वेळा संधी दिली, त्यामुळे आता…’

by nagesh
Anil Parab | transport minister anil parab big statement on protesting MSRTC bus employee

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनएसटी महामंडळाचे (ST Corporation) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण (Merger) करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपावर (ST Workers Strike) आहेत. राज्य सरकारने (State Government) एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करुन त्यांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठे विधान (Big Statement) केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 4 वेळा संधी देऊनही ते कामावर आले नसल्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेणार नसल्याचे अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनिल परब हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कारवाई संदर्भात मोठे विधान केले. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना 2 नाही तर 4 वेळा कामावर हजर राहण्याची आणि कारवाई मागे घेण्याची संधी दिली. मात्र, यानंतरही ते कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे आता या कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचे परब (Anil Parab) यांनी सांगितले. तसेच आता कर्मचाऱ्यांनी अगोदर कामावर रुजू व्हावं त्यानंतर कोणाशीही बोलणी करायला सरकार तयार असल्याचे परब यांनी सांगितले.

आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे

ज्या एसटी कामगारांवर आता कारवाई करण्यात आलेली आहे ती माघारी घेतली जाणार नाही. दिवाळीच्या अगोदर पासून आतापर्यंत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या 50 गटांना भेटी दिल्या आहेत. 28 युनियनच्या कृती समितीबरोबर करारही केला आणि बाकीच्या मागण्या मान्य केल्या. यानंतरही ते आंदोलन (ST Workers Agitation) मागे घेत नाहीत याचा अर्थ एसटी कामगारांचे आंदोलन चुकीच्या दिशेने भरकटत चालले असल्याचे परब यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सदावर्तेंनी रीतसर पोलीस संरक्षण मागावं

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या जीवाला धोका या हवेतल्या गोष्टी आहेत.
त्यांच्या जीवाला जर धोका असेल, तर त्यांनी रीतसर पोलीस संरक्षण (Police Protection) मागावं.
शासन त्यांना संरक्षण देईल.
कोणाच्याही जीवाला धोका करण्याची इच्छा नाहीये, असेही परब यांनी यावेळी नमूद केलं.

Web Title:  Anil Parab | transport minister anil parab big statement on protesting MSRTC bus employee

हे देखील वाचा :

Post Office Internet Banking | पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल नेट बँकिंगची सुविधा, कशी करू शकता अ‍ॅक्टिव्ह? जाणून सविस्तर प्रक्रिया

Pune Crime | पुण्यात निवृत्त पोलीस महासंचालकांच्या बहिणीच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…

Related Posts