IMPIMP

APY | केवळ 14 रुपये प्रतिदिवसाच्या गुंतवणुकीवर दरमहिना मिळेल 5,000 रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा

by nagesh
APY | earn money with atal pension yojana invest 14 rupees daily and earn 10000 per month APY

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाAPY | जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana-APY) पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन घेऊ शकतो, ज्यांच्याकडे पोस्ट किंवा बँकेत खाते आहे. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागते. (APY)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे अटल पेन्शन योजना ?
अटल पेन्शन योजनेत केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5,000 रुपये निवृत्ती वेतन मिळू शकते. जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे दरमहा मिळतील 10,000 रुपये
जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाली, तर वयाच्या 60 व्या वर्षी, दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी केवळ 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. त्याच वेळी, 39 वर्षांपेक्षा कमी वयाचे पती-पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून 60 वर्षांचे झाल्यानंतर, दोघांना एकत्रित दरमहा 10,000 रुपये पेन्शन मिळेल. (APY)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कर लाभ
अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणार्‍याना आयकर कायदा 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय, विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. अशा प्रकारे, या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे.

एपीवायचे मृत्यू लाभ
जर या प्लॅनच्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी बाय डिफॉल्ट नॉमिनी होईल आणि पत्नीला योजनेचे सर्व फायदे मिळतील. पत्नीलाही धारकाप्रमाणेच पेन्शन मिळते. जर पत्नी हयात नसेल तर, सबस्क्राइबरने केलेल्या नॉमिनीला यासाठी निश्चित केलेल्या कॉर्पसचा लाभ मिळतो. म्हणजेच नॉमिनीला निश्चित पेन्शन मिळते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : APY | earn money with atal pension yojana invest 14 rupees daily and earn 10000 per month APY

हे देखील वाचा :

Chinmayi Sumit | ‘मराठी शाळाच टिकल्या नाही तर मराठी पाट्या कशा वाचता येणार’ अभिनेत्री चिन्मयी सुमितचा सरकारला सवाल

Mustard Oil-Hair Problems | ‘हे’ तेल लावायला करा सुरुवात, केस गळणे थांबेल तसेच केस होतील काळे, दाट आणि मुलायम

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील खराडी ते लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये 20 वर्षीय युवतीवर बलात्कार

Related Posts