IMPIMP

Aryan Khan Drugs Case |’क्रूझ ड्रग्स पार्टीवरील छापा बनावट, या मागे भाजप’; आघाडी सरकारमधील मंत्र्याचा स्फोटक दावा (व्हिडिओ)

by nagesh
Aryan Khan Drugs Case | ncp minister nawab malik press conference ncb alligations drug case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन कॉर्टेलिया क्रुझवर (Cortellia Cruz) एनसीबीनं छापा टाकून अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याच्यासह 8 जणांना अटक केली. NCB नं केलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गंभीर आरोप केला आहे. मुंबईच्या समुद्रात क्रुझवरील पार्टीवर एनसीबीने (NCB Raid) टाकलेला छापा (Aryan Khan Drugs Case) पूर्णपणे बनावट (fake) आणि एका योजनेद्वारे करण्यात आला आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) यांच्यासारख्या हायप्रोफाइल आरोपींना भाजपचे (BJP) पदाधिकारी पकडून ओढथ नेत होते, असे सांगतानाच क्रूझवर कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नसल्याचा स्फोटक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हा स्फोटक दावा करताना नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. या फोटो आणि व्हिडिओमध्ये काही लोक आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना अटक करुन ओढत नेत आहेत. हे पकडून नेणाऱ्या लोकांमध्ये जे.पी. गोसावी (J.P. Gosavi) आणि मनीष भानुशाली (Manish Bhanushali) यांचा समावेश आहे. मनीश भानुशाली हे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा (Amit Shah), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशीष शेलार (Ashish Shelar) अशा नेत्यांसोबत फोटो आहेत. जे.पी. गोसावी हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत. असे असताना हे लोक एनसीबीच्या छापेमारीत कसे ? गोसावी आणि भानुशाली यांचा एनसीबीशी काय संबंध, असे सवाल मलिक यांनी केले असून एनसीबीने याचा खुलासा करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. (Aryan Khan Drugs Case)

एनसीबीने नियमांचे पालन केले नाही

एनसीबीने दावा केला आहे की, त्यांनी 26 अधिकाऱ्यांनी छापा टाकला. प्रत्यक्षात 8 ते 10 जण त्यावेळी उपस्थित होते.
अधिकारी काहीही माहिती देतात. नेमकी किती लोकं होती. यावेळी त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले.
एनसीबीनं काही फोटो शेअर केले आहेत. त्यात सांगतिलं चरस, कोकेन, केमिकल आणि गोळ्या आहेत.
ते जप्त केले आहेत. कोणत्याही कारवाईमध्ये काय जप्त करायचे याचे काही नियम आहेत.
परंतु त्याचे पालन झाले नसल्याने हा छापा पूर्णपणे बनावट (Aryan Khan Drugs Case) असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

Web Title :- Aryan Khan Drugs Case | ncp minister nawab malik press conference ncb alligations drug case

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकार आणणार जेष्ठ नागरिकांसाठी ‘बेस्ट पेन्शन योजना’; मिळणार निश्चित परतावा; जाणून घ्या

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे (व्हिडीओ)

HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

Related Posts