IMPIMP

Ashadi Ekadashi | आषाढी एकादशीनिमीत्त एन.ई.एम.एस. पूर्वप्राथमिक शाळेमध्ये ऑनलाईन पालखी सोहळ्याचे आयोजन

by bali123
Ashadi Ekadashi | NEMS on the occasion of Ashadi Ekadashi Organizing online palanquin ceremony in pre-primary school

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) एन.ई.एम.एस. पूर्वप्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त (Ashadi Ekadashi) ऑनलाइन पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. आषाढी एकादशी निमित्त (Ashadi Ekadashi) आयोजित या सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत ऑनलाइन सहभागी (Online participants) झाले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सोहळ्याच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी (Shilpa Kulkarni) यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. त्यानंतर दिंडी चालली पंढरीला, विठ्ठलाच्या दर्शनाला… हे भजन म्हणत सर्व शिक्षिका व कर्मचारी दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी झाले. शाळेतील शिक्षिका मनीषा सूर्यवंशी (Manisha Suryavanshi) यांनी वारी परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विठ्ठलाला प्रिय असणाऱ्या तुळशीचे महत्त्व सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने घरी तुळशीचे रोप लावावे, त्याची काळजी घ्यावी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोज तुळशीचे सेवन करावे असा संदेश दिला.

Ashadi Ekadashi | NEMS on the occasion of Ashadi Ekadashi Organizing online palanquin ceremony in pre-primary school

शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी पटवर्धन (Music teacher Ashwini Patwardhan), सहशिक्षिका अपर्णा हेंद्रे (Aparna Hendre) यांनी कार्यक्रमाच्या तयारीत विशेष सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी शाळा समिती सदस्या डॉ. सविता केळकर (Dr. Savita Kelkar) उपस्थित होत्या. शाला समिती अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे (Adv. Ashok Palande) यांच्या मार्गदर्शनाने सोहळा उत्साहात पार पडला.

Web Title : Ashadi Ekadashi | NEMS on the occasion of Ashadi Ekadashi Organizing online palanquin ceremony in pre-primary school

Related Posts