IMPIMP

Aspirin Side Effects | हार्ट अटॅक रोखण्याची ‘ही’ पद्धत जीवघेणी, एक्सपर्टने दिला इशारा

by nagesh
Healthy Heart | omega 3 fatty acid for healthy heart attack coronary disease flax seeds soybean fish egg walnut

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aspirin Side Effects | हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकपासून वाचण्यासाठी अनेक लोक अ‍ॅस्परिन औषध घेतात. आता हेल्थ एक्सपर्ट लोकांना या सवयीपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत. US प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्सने या अ‍ॅडव्हायजरीसाठी एक नवीन ड्राफ्ट तयार केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, ज्या ज्येष्ठांना हृदयरोग नाही त्यांना पहिल्या हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकपासून वाचण्यासाठी डेली डोसमध्ये अ‍ॅस्परिन औषध घेण्याची आवश्यकता नाही. (Aspirin Side Effects)

यापूर्वी पॅनलनेच दिला होता सल्ला

यापूर्वी 2016 मध्ये पॅनलनेच पहिला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकपासून वाचण्यासाठी अ‍ॅस्परिन औषध घेण्याचा सल्ला दिला होता.
त्यावेळी पॅनलचे म्हणणे होते की, 50-60 वर्ष वयाचे लोक डेली डोसमध्ये अ‍ॅस्परिन औषधाचा वापर करू शकतात.
यामुळे हार्ट अटॅकशिवाय कोलोरेक्टल कॅन्सरपासून सुद्धा बचाव करता येऊ शकतो.
परंतु आता पॅनलच्या नवीन ड्राफ्टमध्ये या शिफारसींमध्ये बदल करण्यात आला आहे.
पॅनलचे म्हणणे आहे की, याचे आणखी पुरावे जमवण्याची आवश्यकता आहे. (Aspirin Side Effects)

60 वर्षावरील लोकांना हा धोका

ड्राफ्टमध्ये म्हटले आहे की, 60 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्यांना अगोदर कधी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आलेला नाही.
त्यांनी अ‍ॅस्परिन औषधाने कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. उलट यामुळे ब्लिडिंगचा धोका वाढू शकतो.

या लोकांना होऊ शकतो थोडा फायदा

पॅनलने पहिल्यांदाच अ‍ॅस्परिन औषधाबाबत अशाप्रकारचा ड्राफ्ट बनवला आहे. पॅनलनुसार 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना या औषधाचा थोडा फायदा मिळू शकतो.
तर 50 च्या वयात लोकांना या औषधाचा कोणताही लाभ मिळत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या लोकांसाठी आहे गाईडलाईन

ही गाईडलाईन प्रामुख्याने हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि इतर आजारांना तोंड देत असलेल्या लोकांसाठी आहे.
कारण या सर्व गोष्टी हार्ट हटॅक किंवा स्ट्रोकची शक्यता वाढवतात. याशिवाय अ‍ॅस्परिन औषध घेणे किंवा थांबवण्यापूर्वी डॉक्टरांशी आवश्य संपर्क करा.
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जॉन वोंग यांनी म्हटले की, अ‍ॅस्परिन शरीराचे गंभीर नुकसान करू शकते कारण वयासोबत त्याचा धोका वाढत जातो.

प्रथम डॉक्टरांशी संपर्क करा

अ‍ॅस्परिन औषध एक पेन किलर आहे परंतु ते ब्लड थिनरचे सुद्धा काम करते. हे औषध ब्लड क्लॉटिंग कमी करते.
मात्र, कमी डोस घेतला तरी या औषधाचे तोटे सुद्धा आहेत. यामुळे पचनक्रिया किंवा अल्सरमध्ये ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते जे जीवघेणे ठरू शकते.
याचा कारणामुळे हेल्थ एक्सपर्ट अ‍ॅस्परिन औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांशी संपर्क करण्याचा सल्ला देत आहेत.

Web Title : Aspirin Side Effects | heart attack stroke diseases aspirin medicine side effect health bleeding risks

Jacqueline Fernandez | ‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शुटिंगसाठी

Pune Crime | MBA ची प्रवेश परिक्षा पास करुण देण्याची हमी देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

BSNL ‘या’ ग्राहकांना देतंय 4 महिन्यापर्यंत फ्री ब्रॉडबँड सर्व्हिस, जाणून घ्या सविस्तर

Related Posts