IMPIMP

Atul Bhatkhalkar | ‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’; भातखळकरांचा शरद पवारांना टोला

by nagesh
Atul Bhatkhalkar | bjp mla atul bhatkhalkars criticism after sharad pawars claim about mahavikas aghadi government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Atul Bhatkhalkar | राष्ट्रवादी काॅग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) 5 वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा त्यांनी केला. यानंतर आता भाजप नेते (BJP) आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवार यांच्या दाव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले की, महाविकास आघाडी 5 वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल, इति शरद पवार. महाविकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही”. असा जोरदार निशाणा त्यांनी शरद पवारांवर साधला आहे. भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातुन याबाबत आपली भुमिका मांडली आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) येथे बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपाचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण 2 वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp mla atul bhatkhalkars criticism after sharad pawars claim about mahavikas aghadi government

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | अखेर प्रा.डॉ. राजन शिंदेंच्या खुनाचं गूढ उकललं; कसं मारायचं याचा शोध घेतला Google वर!

Mumbai University | मुंबईतील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Multibagger Stock | गुंतवणुकदारांमध्ये सुपरहिट आहे ‘ही’ म्युझिक कंपनी, एक वर्षात 700 टक्केपेक्षा जास्त दिला ‘रिटर्न’; जाणून घ्या

Related Posts