IMPIMP

Aundh Road-Khadki Railway Junction | खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील अतिक्रमणाबाबत संयुक्तपणे कारवाई करा – जिल्हाधिकारी

by nagesh
Aundh Road-Khadki Railway Junction | Take joint action on encroachment at Khadki Railway Station Junction – Pune Collector IAS Dr. Rajesh Deshmukh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन (Aundh Road-Khadki Railway Junction) परिसरातील वाहतूक कोंडी (Pune Traffic Jam) सोडविण्याच्यादृष्टीने रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC), सार्वजनिक बांधकाम विभाग Public Works Department (PWD) आणि खडकी कटक मंडळाने Khadki Cantonment Board (KCB) संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले. (Aundh Road-Khadki Railway Junction)

औंध रोड-खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne), निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Pune RDC Jyoti Kadam), खडकी कटक मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. (Aundh Road-Khadki Railway Junction)

डॉ. देशमुख म्हणाले, या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याबाबत रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातूनही निर्देश देण्यात आले आहेत.
या परिसरातील वाहतूकीची समस्या लक्षात घेता महानगरपालिकेने वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणारी
अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच कटक मंडळाच्या सहकार्याने ती
दूर करावीत. यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे त्यांनी सांगितले.

आमदार शिरोळे यांनी परिसरातील वाहतूककोंडीची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Savitribai Phule Pune University (SPPU)
येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने खडकी रेल्वे जंक्शन परिसरातील मार्गावर वाहतूकीचा ताण येत
असल्याने तेथील अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : Aundh Road-Khadki Railway Junction | Take joint action on encroachment at Khadki Railway Station Junction – Pune Collector IAS Dr. Rajesh Deshmukh

Related Posts