IMPIMP

Aurangabad ACB Trap | सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाच्या बिलासाठी लाच घेणारे दोन अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; पैठणमधील प्रकार

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन   स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडूळ येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तक्रारदारांनी केले होते. त्यांना त्या कामाचे 2 लाख 10 हजार रुपये मिळणे बाकी होते. त्या रकमेचा धनादेश काढण्यासाठी ग्रामपंचायतीतील पदविस्तार अधिकारी आणि ग्रामविस्तार अधिकारी यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी (Aurangabad ACB Trap) केल्याचा प्रकार आडूळ गावात घडला आहे. याप्रकरणी विभागाला तक्रार प्राप्त होताच विभागाने सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांच्या (Aurangabad ACB Trap) मुसक्या आवळल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याविषयीची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या वहिनी ग्रामपंचायत आडूळ येथील माजी सरपंच आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियानांतर्गत आणि ग्रामपंचायतीच्या आदेशाने (कंत्राट मिळवून) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडूळ येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यांना या कामाचा 2 लाख 10 हजार रुपयांचा मंजूर बिलाचा धनादेश मिळणार होता. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत आडूळ येथे अधिकाऱ्यांना या धनादेशाची मागणी केली. पण, येथील पदविस्तार अधिकारी अशोक सूर्यभान घोडके (वय 36) आणि ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळंबकर (वय 56) यांनी रुपये 50 हजार लाचेची मागणी केली.

या प्रकरणी अधिकारी अशोक सूर्यभान घोडके यांनी 10 हजार लाचेची मागणी केली होती.
त्यांनी तडजोड करत 5 हजार रुपयांची लाच स्वीकारली,
तर आरोपी क्रमांक 2 बळीराम दगडू कळंबकर यांनी 50 हजार रुपयांची लाच मागत तडजोड करत
40 हजार लाच स्वीकारली. त्यामुळे दोन्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे,
पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे,
पोलीस अंमलदार भीमराव जिवडे, विलास चव्हाण, पोलीस नाईक दिगंबर पाठक,
चालक पोलीस अंमलदार बागुल यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Aurangabad ACB Trap | Two officers in ‘ACB’ net for taking bribe for public toilet construction bill; Type in Paithan

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | ‘फुरसुंगी आणि उरूळी देवाचीमध्ये बहुतांश विकासकामे झाल्याने आम्हाला महापालिकेची गरज नाही’ – माजी मंत्री विजय शिवतारे

Shivsena Uddhav Thackeray Group | कोल्हापूरचे मैदान मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा नवा मल्ल; वंचितचे हाजी अस्लम सय्यद शिवबंधनात

Related Posts