IMPIMP

Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

by nagesh
Pune Crime News | Detectives managed to secretly photograph a woman in Koregaon Park; The police laid a trap and arrested him

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये एक संतापजनक घटना समोर (Aurangabad Crime) आली आहे. कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो (Pornographic Photos Viral On Social Media) व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत 39 वर्षीय तक्रारदार महिलेकडून 18 हजार 184 रूपये गायब केले आहे. पैसे उकळल्यानंतर देखील आरोपींनी महिलेच्या आधारकार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card) व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून ते अश्लील मजकुरासह सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तक्रारदार महिला मूळची पुणे (Pune) येथील खडकी परिसरातील असून ती सध्या औरंगाबादमध्ये राहत आहे. दरम्यान, भामट्यांनी 20 एप्रिल ते 30 मे 2022 दरम्यान तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर वेगवेगळ्या सोळा क्रमांकावरून फोन करून तुम्ही संस्थेकडून घेतलेले कर्ज बाकी असून त्याची परतफेड करा, नाही तर आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर 18 हजार 184 रुपये पाठवले होते. (Aurangabad Crime)

त्यानंतर तक्रारदार महिलेकडून पैसे घेतल्यानंतर देखील भामट्यांनी तिचे आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर
कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून सोशल मीडियावर तक्रारदार महिलेविषयी अश्लील आणि
आक्षेपार्ह मजकूर शेअर करून तिची बदनामी केली आहे. यानंतर महिलेनं आरोपीविरुद्ध
उस्मानपुरा पोलीस ठाण्यात (Usmanpura police station) तक्रार दाखल केली आहे.
यावरुन त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title :- Aurangabad Crime | Pornographic photos of the woman went viral on social media as the debt was not paid

हे देखील वाचा :

Girish Mahajan On Shivsena | गिरीश महाजनांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही बिकट अवस्था शिवसेनेची होईल’

FIR On Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध FIR, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

Mumbai High Court On Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले – ‘हा कसला सामाजिक न्याय?’

Related Posts