IMPIMP

Avoid Fake Fastag | ऑनलाईन विकला जातोय बनावट Fastag, सरकारने सांगितले बचावाची पद्धत

by nagesh
Avoid Fake Fastag | fake fastag being sold online the government told how to avoid

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Avoid Fake Fastag | आधुनिक टोल नियमांना गती देण्यासाठी Fastag ची व्यवस्था करण्यात आली, यातून लोकांना वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांपासून दिलासा मिळाला. परंतु आता याबाबत काही फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. ज्याबाबत एनएचआयने इशारा सुद्धा जारी केला आहे की, Fastag खरेदी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. (Avoid Fake Fastag)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

NHAI ने पुढे माहिती देताना म्हटले की, काही सायबर गुन्हेगारांनी बनावट FASTag ऑनलाईन विकण्यास सुरूवात केली आहे.
फसवणूक करणार्‍यांनी NHAI किंवा IHMCL प्रमाणेच बनावट FASTag विकत आहेत.
जे खर्‍यासारखे दिसतात, परंतु ते बनावट आहेत. या फ्रॉडपासून कसा बचाव करावा ते जाणून घेवूयात…

FASTag योग्य ठिकाणाहून खरेदी करा

ओरिजनल FASTag खरेदीसाठी, वेबसाइट https://ihmcl.co.in/ वर किंवा MyFastag App वरून मिळवू शकता.
किंवा FASTag लिस्टेड बँका आणि विक्री एजंटच्या अधिकृत पॉईंट ऑफ सेलवरून सुद्धा खरेदी करू शकता.

येथून सुद्धा मिळवू शकता फास्टॅग

FASTag लवकर मिळवण्यासाठी Amazon.in वर सुद्धा जाऊ शकतो किंवा ICICI बँक, HDFC बँक, एयरटेल पेमेंट्स बँक, एसबीआय, कोटक बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि पेटीएम पेमेंट्स बँकसारख्या बँकांशी संपर्क साधू शकता. (Avoid Fake Fastag)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

FASTag रिचार्ज कसे करावे?

आपले FASTag खाते रिचार्ज करण्यासाठी, बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा NEFT किंवा RTGS किंवा नेट बँकिंगचा वापर करून ऑनलाईन पेमेंट करू शकता.
FASTag अकाऊंट 1 लाख रुपयांपर्यंत रिचार्ज करू शकता. याशिवाय सुविधेनुसार, गुगल पे, पेटीएम, एयरटेल पेमेंट्स बँक आणि फोनपेवरून ऑनलाईन पेमेंट करू शकता.

बनावट फास्टॅगसाठी येथे करा तक्रार

एनएचएआयने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, जर तुम्ही चुकीने बनावट फास्टॅग खरेदी केला आहे
तर तुम्ही राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाईन नंबर 1033 वर कॉल करून तक्रार करू शकता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Avoid Fake Fastag | fake fastag being sold online the government told how to avoid

हे देखील वाचा :

Mumbai School Reopen | मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय ! ‘मुंबईत उद्यापासून शाळा सुरु होणार नाहीत, तर…’

Omicron Variant | पुणेकरांची चिंता वाढली ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीमध्ये ‘कोरोना’ची लक्षणं, रिपोर्टची प्रतीक्षा

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

Related Posts