IMPIMP

Bacchu Kadu | शरद पवार यांच्या मनात नेमकं काय चालतं? बच्चू कडू म्हणाले…

by nagesh
Bacchu Kadu | after two and a half years as a minister bachu kadus answer revealed his displeasure once again

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन Bacchu Kadu | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी खेळी करत आपले उमेदवार निवडून आणले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही त्यांचे कौतूक केले आहे. याबाबत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी म्हटले की, पवार जेव्हा कुणाचे कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांना विविध मार्गाने अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार म्हणाले होते. पवार यांच्या याच वक्तव्यावर कडू (Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली.

पवारांच्या मनात काय, याचा थांगपत्ता लागत नाही

बच्चू कडू पुढे म्हणाले, पवारांनी मुळात फडणवीस यांचे कौतुक केले, असे नाही. समुद्राची खोली जशी मोजता येत नाही, तसे पवारांच्या मनात काय आहे, याचा थांगपत्ता लागू शकत नाही. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणार्‍या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला (BJP) यश आले. हा चमत्कार मान्य करावा लागेल.

सर्वांनी आपआपले पाहिल्याने पराभव

बच्चू कडू (Bacchu Kadu) पुढे म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मोठ्या पक्षांचे नियोजन चुकले.
अपक्ष आमदार राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देणार होते, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला हवे होते.
बड्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय ते फुटलेच नसते. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेल तर ते शोधले पाहिजे.
या निवडणुकीत सर्वांनी आपआपले पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा पराभव झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Bacchu Kadu | bacchu kadu comment over sharad pawar appreciation of devendra fadnavis

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! पुण्यात बसमध्येच चालकाचा 21 वर्षीय महिलेवर बलात्कार

Corona Fourth Wave | ज्याची सर्वांना भीती होती तेच घडलंय, ‘कोरोना’ची चौथी लाट सुरु – WHO

MNS Vasant More | वसंत मोरे यांनी प्रभाग क्र. 56, 57, 58 मधून मनसेचे 5 नगरसेवक निवडूण आणण्याचा विडा उचलला; पक्षांतर्गत ‘विरोधक’ ‘तात्यां’ प्रमाणे चॅलेंज स्वीकारणार ?

Related Posts