IMPIMP

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

by nagesh
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम – Bad Cholesterol | रक्तातील खराब म्हणजे एलडीएल कोलेस्ट्रॉलचा जास्त स्तर हा अनेक गंभीर रोगांच्या प्रमुख जोखीम घटकांपैकी एक आहे. हे ब्लड प्रेशरची पातळी वाढवते, तसेच हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि फेल्यूअर इत्यादी हृदयविकार होतात. यामुळे मूत्रपिंडाचे जुनाट आजारही होऊ शकतात. (Bad Cholesterol) त्यामुळे गंभीर आजार टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. पण शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल कसे वाढवायचे आणि बॅड कोलेस्ट्रॉल कसे कमी करायचे याबद्दल लोक खूप अस्वस्थ असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदाने सुचवलेल्या काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही सहजपणे कोलेस्ट्रॉल कमी करू शकता (Ayurvedic Remedies To Reduce Cholesterol).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आयुर्वेदिक वैद्य डॉ. वरलक्ष्मी यनामंद्रा (BAMS) यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये आयुर्वेदाच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कसे कमी करू शकता याबद्दल सविस्तरपणे सांगितले आहे. त्यांच्या मते, आयुर्वेदात वाढत्या कोलेस्टेरॉलच्या समस्येला ‘मेदरोग’ म्हणतात, जो शरीरातील मेद धातू किंवा फॅट टिश्यूच्या असामान्य कार्याशी संबंधित आहे. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ५ आयुर्वेदिक उपाय (cholesterol kami karnyache ayurvedic upay) जाणून घेवूया…

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Remedies To Reduce Cholesterol)

१. दीपन आणि पचन (Deepana And Pachan)
 जठर अग्नी ठिक करा आणि वाढवण्याचा प्रयत्न करा. यासाठी सहज पचन होणाऱ्या औषधी वनस्पती खाऊ शकता, जसे की सुंठ.

 उपवास करा, याचा खूप फायदा होईल.

 हलके पदार्थ खा, तसेच सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करा. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी लवकर कमी होण्यास मदत होईल.

२. जड पदार्थ आणि चुकीचे फुड कॉम्बिनेशन टाळा
 उडदाची डाळ, दुग्धजन्य पदार्थ आणि साखर, मांस, नट आणि नट बटर यासारखे जड पदार्थ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा.

 दोन असे पदार्थ ज्यांचे प्रभाव आणि गुणधर्म वेगवेगळे आहेत ते एकत्र खाणे टाळा, जसे की, दुधात फळे, गरम पाण्यात मध, दूध आणि मासे इ.

३. कफ दोष संतुलित करा
 गरम, हलकी आणि सहज पचणारी धान्ये आणि कडधान्ये खा, जसे की लाल तांदूळ, बार्ली, हरभरा आणि मूग डाळ.

 मातीच्या वर वाढणाऱ्या भाज्यांचा वापर आदर्श मानला जातो.

४. शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा
 दोरी उडी मारणे, पोहणे, वेगाने चालणे आणि सायकल चालवणे यासारखे काही सोपे व्यायाम दिनचर्येचा भाग बनवा. ड्राय ब्रशिंग किंवा लेखन पावडर जसे की त्रिफळासह मसाज करणे खूप फायदेशीर मानले जाते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

५. गरम पाण्याचे सेवन करा
 आम म्हणजेच टॉक्सीन्स हे शरीरातील मेटाबॉलिक रोगाचे मुख्य कारण आहे, ज्यामुळे वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. ते दूर करण्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर आहे. ते अग्नि वाढवते.

 दैनंदिन जीवनात दररोज या सोप्या आयुर्वेदिक उपायांचे अनुसरण करून, सहजपणे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करू शकता आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवू शकता.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

हे देखील वाचा :

Narayan Rane | वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर नारायण राणे यांचा ‘प्रहार’; म्हणाले…

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांची विजयी घौडदौड !!

Related Posts