IMPIMP

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

by nagesh
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays | देशात सणासुदीचा काळ सुरु होताच सुट्ट्यांचे सत्रही सुरू झाली आहे. पुढच्या आठवड्यात बँकांशी संबंधित काही काम असेल तर तुम्हाला ते ऑनलाइन करावे लागेल. अशावेळी, जर तुम्हाला एखाद्या कामासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता असेल, तर प्रथम सुट्टीची संपूर्ण यादी तपासा. आता ऑगस्टच्या उर्वरित दिवसात एकूण 8 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि सणासुदीच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. (Bank Holidays)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आजपासून म्हणजे 13 ऑगस्टपासून बँकांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आज महिन्याचा दुसरा शनिवार. 14 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँक बंद राहणार आहे. 15 ऑगस्ट ही राष्ट्रीय सुट्टी आहे. त्याचप्रमाणे पुढील आठवड्यात एकूण 5 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक प्रत्येक आर्थिक वर्षात बँकांसाठी सुट्ट्यांची यादी निश्चित करते. प्रत्येक राज्यासाठी ती वेगळी असू शकते. आरबीआय तीन श्रेणींमध्ये बँकांसाठी सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवते. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्टच्या सुट्ट्या, रिअल टाइम ग्रोस सेटलमेंट हॉलिडे आणि बँक क्लोजिंग ऑफ अकाऊंट हॉलिडेचा समावेश आहे. (Bank Holidays)

ऑगस्टच्या उर्वरित दिवसात या तारखेला बंद राहतील बँका

13 ऑगस्ट : दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट : पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट : जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
21 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
31 ऑगस्ट : गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)

घरबसल्या करू शकता कामे

जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल आणि बँक बंद असल्यामुळे अडचणी येत असतील तर तुम्ही घरबसल्या त्या संबंधित काही कामे करू शकता. यासाठी ऑनलाइन बँकिंग वापरू शकता. मोबाईल बँकिंग वापरू शकता. जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर यूपीआय वापरू शकता. जर बँक खाते उघडायचे असेल तर संबंधित बँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर लॉगिन करू शकता. अशा प्रकारे बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

हे देखील वाचा :

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

Related Posts