IMPIMP

Bank Holidays | पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहतील बँका, कामासाठी जाण्यापूर्वी पाहून घ्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

by nagesh
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Holidays | नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरपूर सण (Festive season) आहेत. 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि गोवर्धन पूजेने सुरू होणारे सण शनिवारी भाऊबीजला (Bhaubeej) संपतील. या कारणामुळे पुढील आठवड्यात 5 दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी (Diwali), धनत्रयोदशी, भाऊबीज, गोवर्धन पूजासारखे सण आहेत, ज्यामुळे बँकांचे कामकाज (Bank band) होणार नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

विविध राज्यांप्रमाणे सुट्टी
आरबीआयने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार यामध्ये असे दिवस सुद्धा आहेत जेव्हा काही विशेष क्षेत्रात सण किंवा जयंतीमुळे बँका उघडणार नाहीत. आरबीआयच्या कॅलेंडरप्रमाणे बँकांची सुट्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळी असते. नोव्हेंबरमध्ये सुट्ट्यांची (Bank Holidays) मोठी यादी आहे.

अगोदरच उरकून घ्या महत्वाची कामे
आरबीआयची सुट्ट्यांची यादी पाहता बँकेची जी महत्वाची कामे आहेत ती अगोदरच उरकून घेतली पाहिजेत. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. म्हणून, 1 नोव्हेंबर 2021 ला बेंगळुरु आणि इम्फाळमध्ये बँका बंद (Bank Holidays) राहतील.

शनिवार, रविवारची सुटी
यानंतर 3 नोव्हेंबरला नरक चतुर्दशीला केवळ बेंगळुरुमध्ये बँकांमध्ये सामान्य कामकाज होणार नाही.
संपूर्ण देशात 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी बँकांना सुटी असेल.
तर, 13 नोव्हेंबरला दुसरा आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशातील बँका बंद राहतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सुट्ट्या…

1 नोव्हेंबर – सोमवार – कन्नड राज्योत्सव – इम्फाळ आणि बेंगळुरू मध्ये बँक बंद राहतील.

3 नोव्हेंबर – बुधवार – नरक चतुर्थीमुळे बेंगळुरू मध्ये बँका बंद राहतील.

4 नोव्हेंबर – गुरुवार – दिवाळी आणि कालिकापूजेसाठी आगरतळा, अहमदाबाद, बेंगळूरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपुर, कानपुर, कोच्ची, मुंबई, नागपुर, लखनऊ सारख्या शहरात बँका बंद राहतील.

5 नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा- अहमदाबाद, बेलापुर, बंगळुरू, गंगटोक, देहरादूनमध्ये बँका बंद राहतील.

6 नोव्हेंबर – शनिवार – भाऊबीजची गंगटोक, इम्फाळ, कानपुर, लखनऊमध्ये बँकांना सुटी असेल.

7 नोव्हेंबर – रविवारची सुटी. (Bank Holidays)

Web Title :- Bank Holidays | bank holidays next week banks to remain shut for 5 days check bank band list

हे देखील वाचा :

PMC Employees News | जाहीर होऊनही अद्याप ‘बोनस’ नाही ! 7 वा वेतन आयोग नोव्हेंबर मध्ये लागू होणार; कर्मचारी हवालदिल, ‘मनपा’कडे पैसे नाहीत? कर्मचाऱ्यांचा संताप

Gold Price Today | दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण तर चांदीमध्ये वाढ, जाणून घ्या आजचे भाव

Prashant Kishor | ‘पुढील अनेक वर्षे देशात BJP चे वर्चस्व राहणार, मोदींच्या शक्तीचा राहुल गांधींना अंदाज नाही’

Related Posts