IMPIMP

Bank Locker Rules | बदलले बँक लॉकरसंबंधीचे नियम, कोणतेही किमती सामान ठेवण्यापूर्वी जाणून घ्या नवीन नियम

by nagesh
Bank Locker Rules | bank locker rules changed banks to pay 100 times of locker rent as penalty

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Locker Rules | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून बँक ग्राहकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन वेळोवेळी
नियमात बदल (Change Rule) केले जातात. यावेळी आरबीआयने बँक लॉकरशी (Bank Locker Rules) संबंधित नियम बदलले आहेत. तुम्हीही
कोणत्याही बँकेत लॉकर घेतले असेल आणि त्यात तुमची मौल्यवान वस्तू ठेवली असेल तर ही बातमी नक्की वाचा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाड्याच्या 100 पट नुकसान भरपाई

रिझर्व्ह बँकेने काल एक अधिसूचना जारी करून बँक लॉकरचे नवे नियम (Bank Locker Rules) जारी केले आहेत. हे नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बँकेत लॉकर घेणार्‍या ग्राहकांच्या तक्रारीवरून आरबीआयने नियम बदलले आहेत. अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरीला गेल्यास संबंधित बँकेच्या वतीने ग्राहकाला लॉकर भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाईल.

सिस्टमध्ये जास्त पारदर्शकता अपेक्षित

आतापर्यंत बँका चोरीच्या घटनेकडे दुर्लक्ष करत होत्या आणि त्याला आम्ही जबाबदार नसल्याचे सांगत होत्या. आरबीआयने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की बँकांना रिकाम्या लॉकरची यादी, लॉकरसाठी प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल. यामुळे लॉकर सिस्टिममध्ये जास्त पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. बँका ग्राहकांना अंधारात ठेवू शकत नाहीत, असे आरबीआयने म्हटले आहे. योग्य माहिती मिळवणे ग्राहकांचा अधिकार आहे.

फसवणूक टाळण्यासाठी नवीन नियम

आता जेव्हा तुम्ही लॉकरचा (Bank Locker Rules) वापर कराल, तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट येईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक (Fraud) टाळण्यासाठी आरबीआयने हा नियम बनवला आहे. तसेच बँकांना लॉकर जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी भाड्याने देण्याचा अधिकार आहे. लॉकरचे भाडे 2000 रुपये असल्यास, इतर देखभाल शुल्क वगळून बँक तुमच्याकडून 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही.

सीसीटीव्ही फुटेज आवश्यक

आता लॉकर रूममध्ये येणार्‍या-जाणार्‍यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे आवश्यक आहे.
तसेच, सीसीटीव्ही फुटेजचा (CCTV Footage) डेटा 180 दिवसांसाठी ठेवावा लागणार आहे.
चोरी किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळल्यास पोलिस आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करू शकणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Bank Locker Rules | bank locker rules changed banks to pay 100 times of locker rent as penalty

हे देखील वाचा :

Shinde Fadnavis Government | भाजपाच्या 12 महिला आमदार पण ’या’ तिघी मंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार?

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts