IMPIMP

Baramati NCP MP Supriya Sule | ‘वयोश्री’ आणि ‘एडीप’ योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा; बारामती लोकसभा मतदार संघातील लाभार्थ्यांसाठी खा. सुळे यांची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा

by nagesh
Baramati NCP MP Supriya Sule | Funds should be made available for purchase of assistive devices under 'Vayoshree' (RVP) and 'EDIP' schemes; For the beneficiaries of Baramati Lok Sabha Constituency. Sule's discussion with Union Ministers

दिल्ली : वृत्तसंस्था– Baramati NCP MP Supriya Sule | ‘वयोश्री’ Rashtriya Vayoshri Yojana (RVY) आणि दिव्यांगांसाठीच्या ‘एडिप’ (ADIP Scheme) या दोन्ही योजनांखाली गेल्या वर्षभरात बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok Sabha Constituency) सर्व तालुक्यांत पूर्वतपासणी शिबिरे घेण्यात आली आहेत. परंतु सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Baramati NCP MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार (Virendra Kumar Khatik Minister of Social Justice and Empowerment) यांची त्यांनी यासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ज्येष्ठ नागरीकांना सहाय्यभूत साधने पुरविण्यासाठी राबविण्यात येणारी वयोश्री आणि दिव्यांगांसाठीच्या ‘एडीप’ या दोन्ही योजनांचे बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय उत्तम काम झाले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक अशा जवळपास एक लाख जणांची तपासणी पूर्ण झाली आहे.

या दोन्ही योजनांखाली वितरीत करण्यात येणाऱ्या सहाय्यभूत साधनांचे आता वाटप करायचे मात्र त्यासाठी निधीच
नसल्याचे सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार सुळे  यांनी केंद्रीय मंत्री विरेंद्र कुमार यांची भेट घेतली.
सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सहाय्यभूत साधनांचे त्वरीत वाटप करणे
शक्य होईल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ही भेट सकारात्मक झाली असून लवकरच निधी उपलब्ध होईल,
असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Baramati NCP MP Supriya Sule | Funds should be made available for purchase of assistive devices under ‘Vayoshree’ (RVP) and ‘EDIP’ schemes; For the beneficiaries of Baramati Lok Sabha Constituency. Sule’s discussion with Union Ministers

हे देखील वाचा :

Nilesh Rane | ‘…म्हणून वैभव नाईक शिवसेनेत’, निलेश राणेंचा गौप्यस्फोट (व्हिडिओ)

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थींना लवकरच अनुदान

Jio Cricket Plan | आयपीएलआधी जिओने लॉन्च केले ‘हे’ तीन जबरदस्त प्लॅन्स; जाणून घ्या प्लॅन्सची खासियत

Related Posts