IMPIMP

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

by nagesh
Basavaraj Bommai | 'we will not give even an inch to Maharashtra' - Basavaraj Bommai

बंगळुरू : वृत्तसंस्था – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना विचारले असता, त्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असे बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले.

या वादावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला होता. तेव्हापासून या वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केली होती. महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली होती. त्यामुळे या वादाला हिंसक वळण लागले होते. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत चर्चा करत आहेत. पण, बोम्मई आपला ताठरपणा सोडायला तयार नाहीत. माझे कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी बोलणे झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच, या प्रकरणात कोणतीही तडजोड करणार नाही. तसेच, अमित शहांबरोबर सीमाप्रश्नावरून कोणतीही चर्चा झाली नाही, असे बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रात असलेल्या कन्नडिगांचे संरक्षण करण्याबाबत सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
याबाबत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्याशी चर्चा केली आहे, असेही बोम्मई यांनी नमूद केले.

Web Title :- Basavaraj Bommai | ‘we will not give even an inch to Maharashtra’ – Basavaraj Bommai

हे देखील वाचा :

MP Amol Kolhe | “कर्नाटक सरकारकडून अडेलटट्टूपणाचे धोरण…” गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष

NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा

Rain in Maharashtra | हिवाळ्यात पाऊस; महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरला पाऊस

Related Posts