IMPIMP

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल

by nagesh
BCCI-Guinness Book Of World Record | bcci guinness book of world record largest attendance t20 match during ipl 2022 final

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – BCCI-Guinness Book Of World Record | आयपीएल 2022 मधील अखेरचा सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात एक मोठा विश्वविक्रम झाला. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या संख्येची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. या विश्वविक्रमाची माहिती बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांनी ट्विट करून दिली आहे. (BCCI-Guinness Book Of World Record)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय आहे विश्वविक्रम?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना 29 मे 2022 साली पडला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स या नवख्या संघाने राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवला होता. हा सामना पाहण्यासाठी 1,01,566 प्रेक्षक मैदानात दाखल झाले होते.

बीसीसीआयने केले ट्विट
या विश्वविक्रमानंतर “आपल्या सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. भारताने आपलं नाव ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं आहे. चाहत्यांच्या समर्थनामुळे हे शक्य झालं,” असे मत बीसीसीआयने व्यक्त केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सचिव जय शाह यांचे ट्विट
“29 मे 2022 साली नरेंद्र मोदी स्टेडियमवर 1,01,566 प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला.
T-20 सामन्यात सर्वाधिक उपस्थितीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला,
अभिमान वाटला. सर्व चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन,” असे जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Web Title :- BCCI-Guinness Book Of World Record | bcci guinness book of world record largest attendance t20 match during ipl 2022 final

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संभाजीराजे आणि उदयनराजे यांची मागणी म्हणजे लोकभावना’; संजय राऊत यांचे वक्तव्य

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘शिवरायांचा अपमान होऊनही भाजप आणि शिंदे गट मंडळी हात चोळत बसली” – संजय राऊत

Pune Pimpri Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, 2 पिस्टल, काडतुसे, कोयते जप्त

Related Posts