IMPIMP

Beed Crime | बीडमध्ये राष्ट्रवादीचा नवनिर्वाचित नगरसेवक निघाला ‘पुष्पा’, पोलिसांकडून FIR; शहरात प्रचंड खळबळ

by nagesh
Beed Crime | case filed against ncp corporator in sandalwood smuggling case in beed

बीड : सरकारसत्ता ऑनलाइनBeed Crime | नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायत निवडणुकीचा (Kej Nagar Panchayat Election) एकीकडे जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे केजमधील राष्ट्रवादीचा (NCP) नवनिर्वाचित नगरसेवक (Corporator) चंदन तस्कर (Sandalwood Smuggler) निघाला आहे. चंदन तस्करी प्रकरणात केज नगरपंचायतच्या नवनिर्वाचित सदस्यासह तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये (Beed Crime) प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नुकत्याच झालेल्या केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी उमेदवरांकडून विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे. मात्र, बीडच्या एका नवनिर्वाचित (Newly Elected) नगरसेवक विरोधात चंदन तस्करी प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या (Ambajogai Rural Police Station) हद्दीत चंदन तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव (Balasaheb Jadhav) असे या नगरसेवकाचे नाव आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या सोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Beed Crime)

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन बाळासाहेब दत्तात्रय जाधव त्यांच्या साथीदारांसह आंबेजोगाई तालुक्यातील वाघाळा शिवारात (Waghala Shivar) अंबा साखर कारखाना (Amba Sugar Factory) जवळील देवकर कुंडकर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड मध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करुन झाड व झाडेचे खोड तपासून गाभा काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाई केली असता 27 किलो चंदनाचा गाभा पकडला.
याची किंमत 67 हजार 500 रुपये असून या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवराव भानुदास कुंडकर (Devrao Bhanudas Kundkar),
बाळासाहेब दत्तात्रय जाधव आणि सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Beed Crime | case filed against ncp corporator in sandalwood smuggling case in beed

हे देखील वाचा :

Reservation In Promotion | सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! सरकारी नोकऱ्यांमध्ये SC आणि ST ना पदोन्नतीत आरक्षण

Crime News | धक्कादायक ! लष्कराच्या 3 जवानांकडून विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून दिली धमकी

Rajesh Tope | ‘राज्यात मास्क मुक्ती होणार का?’ राजेश टोपे म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 जणांवर कारवाई

Related Posts