IMPIMP

Benefits Of Vegetable | ‘या’ 11 भाज्यांचे सेवन केले तर आजारांपासून राहाल चार हात लांब; वाचा आरोग्यवर्धक फायदे

by nagesh
Benefits Of Vegetable

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Benefits Of Vegetable | सध्या कोरोना महामारी आणि पाऊस अशा दोन्ही स्थितीत रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खुप आवश्यक आहे. याकाळात चांगला आहार घेणे खुप आवश्यक आहे. जर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल तर आहारात मिरी, सुंठ, आले, हिंग, कांदा, लसूण (Pepper, Ginger, Hing, Onion, Garlic) यासारख्या पदार्थांचा वापर अधिक करावा. फळभाज्या आणि पालेभाज्या (Vegetable) खाव्यात. या भाज्या कोणत्या ते जाणून घेवूयात. (Benefits Of Vegetable)

भाज्या (Vegetable) आणि फायदे

1. पालक (Spinach) :
शौचाला साफ होते. नेहमी खाण्यास योग्य आहे. रक्तवाढ होते.

2. चाकवत (White Goosefoot) :
वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांचे शमन होते. मूळव्याध, त्वचारोग, पोटाचे विकार, (Piles, Skin Diseases, Stomach Sisorders,) रक्ताची कमतरता यासाठी गुणकारी आहे.

3. तांबडा भोपळा :
किरकोळ शरीर, लघवी साफ न होणे, सर्वांगाची आग होणे, त्वचाविकार यावर उपयोगी. (Benefits Of Vegetable)

4. कांदा (Onion) :
सुका खोकला, रक्तपित्त, हृदय अशक्त असणे, लघवीला अडखळत होणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, संभोगाची इच्छा कमी होणे, मासिकपाळीच्या वेळी पोटात दुखणे, संधिवात, कावीळ, सूज, मूळव्याध, जखम इत्यादीवर परिणामकारक आहे.

5. पडवळ (Snake gourd) :
अजीर्ण, सतत तहान लागणे, पोटात जंत, सूज, अशक्तपणा, पोट साफ न होणे या समस्या दूर होतात.

6. तोंडली (Tondli) :
जखमेवर लेप केल्यास सूज व वेदना कमी होतात. यकृतविकार, कावीळ, रक्तविकार, खोकला, दमा, मधुमेहावर उपयोगी. पण जास्त खाऊ नये.

7. दोडका (Luffa) :
गाठी होणे, रक्त व त्वचारोग, प्लीहा व यकृत या अवयवांना सूज येणे, खोकला यावर गुणकारी.

8. मुळा (Radish) :
मूतखडा, मासिकपाळीच्या समस्या, (Urinary Stones, Menstruation) याव उपयोगी.

9. कारले (Bitter Melon) :
तिन्ही दोषांचे शमन करते.जखमा भरून येणे, यकृतविकार, स्वादुपिंडाचे (Liver Disease, Pancreas) आजार, आमदोष, मूळव्याध, त्वचाविकार, स्थौल्य, विषबाधा, मधुमेहावर विशेष उपयोगी.

10. मेथी (Fenugreek) :
वात व कफ दोषनाशक असून कमी भुक, मधुमेह (Diabetes), आमवात, ताप, स्थौल्य, सूज, जुलाब, मातेला कमी दूध, यावर लाभदायक.

11. वांगे (Aubergine) :
दोषांचे शमन करते. पांढरे वांगे मूळव्याधीवर गुणकारी.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Benefits Of Vegetable

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update 

हे देखील वाचा :

Related Posts