IMPIMP

Benefits Of Walnuts | उन्हाळ्याच्या दिवसात ड्रायफ्रुट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Benefits Of Walnuts | benefits of walnuts in summer

सरकारसत्ता ऑनलाइन – Benefits Of Walnuts | सध्याच्या युगामध्ये तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. सध्या कमी वयातील लोकांनाही आजार होताना दिसत आहे. मधुमेह, रक्तदाब (Diabetes, Blood Pressure) यांसारख्या आजारांना बळी पडत आहेत. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या आहारात योग्य आणि पौष्टीक पदार्थ (Dried Fruit) असणे महत्वाचे असते (Benefits Of Walnuts).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आहारामध्ये अक्रोडचा (Walnuts) समावेश केल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. अक्रोडमध्ये अधिक जीवनसत्त्वे, खनिजे, चांगली चरबी आणि अँटी-ऑक्सिडंट (Vitamin, Mineral, Good Fat And Anti-Oxidants) असतात. अक्रोड तुमची त्वचा, हृदय, मेंदू, कोलेस्ट्रॉल (Skin, Heart, Brain, Cholesterol) इत्यादी उत्तम ठेवण्यास मदत करते. अक्रोड खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी फायदे (Health Benefits Of Eating Walnuts) काय आहेत. याबाबत जाणून घ्या.

अक्रोडचे फायदे (Benefits Of Walnuts) –

टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) –
अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि जुनाट आजारांपासून आपला बचाव होतो.

रक्तदाब (Blood pressure) –
संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज सुमारे 28 ग्रॅम अक्रोड खाल्ले तर त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय देखील निरोगी राहते.

मेंदूचे कार्य (Brain Function) –
नियमित अक्रोड खाल्ल्याने तुमचा मेंदूही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, त्यात असलेले चांगले फॅट, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन ई मेंदूचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात. एवढेच नाही तर वाढत्या वयातही आपला मेंदू सक्रिय राहण्यासही मदत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निरोगी वृद्धत्व (Healthy Aging) –
वाढत्या वयानुसार अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या (Physical And Mental Problems) सुरू होतात. यासाठी आपण कमी वयापासून अक्रोड खायला सुरुवात केल्यास वृद्धापकाळातही आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतो.

वजन नियंत्रण (Weight Control) –
दररोज अक्रोड खाल्यास आपले पोट दीर्घकाळ भरलेले जाणवते, भूक कमी लागते. अक्रोड खाल्ल्याने शरीरात चरबीही वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता.

पचन (Digestion) –
अक्रोड आतड्यांमध्‍ये असल्‍या चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करण्‍याचे काम करतात.
त्यामुळे आपल्या पोटाच्‍या अनेक समस्या कमी होतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Benefits Of Walnuts | benefits of walnuts in summer

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान चालविणाऱ्या केंद्राचा पर्दाफाश; ग्रामीण पोलिसांकडून तिघांवर FIR

Health Tips | रिकाम्या पोटी ‘चहा’ पिता का?; चांगलं की वाईट? जाणून घ्या सविस्तर

Pravin Tarde’s historical film Sarsenapati Hambirrao | छत्रपती संभाजी महाराज यांची आक्रमकता दाखवणारा महाराष्ट्राचा महासिनेमा “सरसेनापती हंबीरराव” चा ट्रेलर प्रदर्शित

Related Posts