IMPIMP

Best healthy food for kids | मुलांना ताकदवान बनवायचे असेल तर खाऊ घाला ‘हे’ 6 पदार्थ, आजार राहतील दूर, जाणून फायदे

by nagesh
Best healthy food for kids | best healthy food for kids health know the amazing benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाBest healthy food for kids | जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मुल शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हावे, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की मुलांचे आरोग्य त्यांच्या आहारावर अवलंबून आहे. त्यांच्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. (Best healthy food for kids)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुलांना ताकदवान बनवा?

डाएट एक्सपर्ट डॉक्टर रंजना सिंह यांच्यानुसार मुलांना रोज व्हिटॅमिन, मिनरल्स, फॅट आणि प्रोटीनचे संतुलित प्रमाणात सेवन केले पाहिजे. त्यांच्या शारीरीक विकासासाठी अतिशय आवश्यक आहे. तुमचे मुल कमजोर असेल तर त्याच्या आहारात तूप, लोणी, डाळ, दूध, केळे, बीटसह हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.

मुलांना हेल्दी ठेवण्यासाठी हे पदार्थ द्या (Eat these food to keep children healthy)

1. बनाना शेक (Banana Shake)

केळे एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. हे कमजोर मुलांसाठी अतिशय लाभदायक आहे. याचा शेक किंवा दूध आणि केळे मुलांना खाऊ घाला. यामुळे त्यांचे वजन वाढेल.

2. डाळींचे सेवन (Consumption of pulses)

डाळी प्रोटीनच्या सर्वात मोठ्या स्त्रोत आहेत. डाळीच्या पाण्यात सुद्धा योग्य मात्रेत प्रोटीन आढळते. मुल कमजोर असेल तर त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला नियमितपणे डाळीचे पाणी प्यायला द्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

3. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन (Consumption of green leafy vegetables)

हिरव्या भाज्यांमध्ये पोषकतत्व असतात. मुलांना ब्रोकली, मटर, पालक आणि कोबी द्या. याद्वारे मुलांना चवीसह पोषणसुद्धा मिळेल.

4. अंडे आणि बटाटा (Eggs and potatoes)

कमजोर मुलांसाठी अंडे आणि बटाटा लाभदायक आहे. कारण बटाट्यात कार्बोहायड्रेट आणि अंड्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात आढळते. कमजोर मुलांचे वजन वाढवण्यासाठी याचे सेवन आवश्यक आहे. (Best healthy food for kids)

5. तूप किंवा लोणी (Ghee or butter)

तूप आणि लोण्यात भरपूर फॅट असते. हे मुलांना नियमित द्यावे. तूप डाळ किंवा चपातीला लावून मुले खाऊ शकतात.

6. मलईचे दूध (Skim milk)

मलईच्या दुधात योग्य प्रमाणात वसा असल्याने मुलांचे वजन वाढण्यास मदत होते. मुल दूध पित नसेल तर शेक किंवा चॉकलेट पावडर मिक्स करा. (Best healthy food for kids)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Best healthy food for kids | best healthy food for kids health know the amazing benefits

हे देखील वाचा :

Pune News | बाणेर-बालेवाडी-पाषाण : काळ्या अंधारातून दीपावलीच्या निमित्ताने प्रकाशाकडे जाणारा ‘सुर संध्या’ एक चांगला कार्यक्रम – मुरलीधर मोहोळ

Maharashtra Rains | दिवाळीच्या पाडव्याला राज्यात पावसाच्या सरी, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

Pune Crime | ‘दृश्यम’ स्टाईल पत्नीच्या प्रियकरचा काढला काटा, मृतदेह जाळला हातभट्टीत; पुण्यातील धक्कादायक घटना

Related Posts