IMPIMP

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

by Team Deccan Express
Best Saving Tips | best saving tips invest in sip and get 50000 per month interest

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Best Saving Tips | महागाईचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एका अंदाजानुसार, निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांची गरज भासत असेल, तर लवकरच तुमच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. (Best Saving Tips)

सहज तयार होईल 1.25 कोटींचा फंड

सध्या बँकांचा सरासरी वार्षिक व्याजदर 5 टक्के आहे. सध्या तो वाढण्याची शक्यता नाही. अशावेळी दरमहा 50 हजार रुपयांच्या व्याजासाठी तुमच्याकडे 1.2 कोटींचा निधी असायला हवा. त्यासाठी एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी.

12 टक्के सरासरी रिटर्न

उदाहरणार्थ, आता तुम्ही 30 वर्षांचे आहात. यावेळी 3500 रुपये दरमहा तुमच्या नावावर एसआयपी करणे सुरू करा. सध्याच्या काळात एसआयपीमध्ये तुम्हाला किमान 12% वार्षिक रिटर्न मिळणे अपेक्षित आहे. (Best Saving Tips)

1.25 कोटी रुपयांचा होईल कॉर्पस

30 वर्षे दरमहा 3500 रुपये जमा करून, तुम्ही 12.60 लाख रुपये गुंतवता. यावर, जर तुम्हाला वार्षिक सरासरी 12 टक्के रिटर्न मिळत असेल, तर 30 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्याकडे 1.23 कोटींचा निधी तयार होईल.

दरमहा मिळेल 50 हजार व्याज

जर तुम्ही 1.23 कोटी रुपयांच्या निधीवर वार्षिक 5 टक्के दराने व्याजाची गणना केली तर ते वार्षिक 6.15 लाख रुपये होते. अशा प्रकारे, तुम्हाला दरमहा 50 हजार रुपयांचे उत्पन्न सहज मिळेल.

म्युच्युअल फंड आणि त्यांचा रिटर्न्स (Mutual Funds And Returns)

एसबीआय स्मॉल कॅप (SBI Small Cap Fund) म्युच्युअल फंडाने गेल्या काही वर्षांत 20.04 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.
दुसरीकडे, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने 18.14 टक्के आणि
इन्वेस्को इंडिया मिडकॅप म्युच्युअल फंड योजनेने 16.54 टक्के दिले आहेत.

Web Title :- Best Saving Tips | best saving tips invest in sip and get 50000 per month interest

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts